

murlidhar mohol
esakal
पुणेः ''नवले पूल येथे वारंवार अपघात होत आहेत. त्यामुळे वाहनांना प्रतितास ६० किलोमीटर ऐवजी प्रतितास ३० इतकी वेगमर्यादेचे बंधन घाला. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली रस्ता सुरक्षा समितीच्या बैठका झालेल्या नाहीत. या बैठका घेण्यास सुरवात करा,'' असे आदेश केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी बैठकीत दिले.