

Pune Navratra Mahotsav
Sakal
पुणे : कला, संस्कृती, गायन, वादन, भजन, नृत्य, संगीत यांचा मनोहारी संगम असणाऱ्या ‘पुणे नवरात्रौ महोत्सवा’चे आयोजन केले आहे. याचे उद्घाटन सोमवारी (ता. २२) सायंकाळी साडेचार वाजता महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते गणेश कला क्रीडा रंगमंच येथे होणार आहे. सर्व कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य असल्याची माहिती आयोजक व अध्यक्ष आबा बागूल यांनी पत्रकार परिषदेत दिली.