पुणे नवरात्रौ महिला महोत्सव तेजस्विनी पुरस्कार जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Navratri Festival

ज्येष्ठ गायिका अनुराधा मराठे, मॉडेलिंग गृमिंग तज्ञ जुई सुहास आणि सह्याद्री क्रांती मळेगावकर यांना ‘तेजस्विनी’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

पुणे नवरात्रौ महिला महोत्सव तेजस्विनी पुरस्कार जाहीर

पुणे - ज्येष्ठ गायिका अनुराधा मराठे, मॉडेलिंग गृमिंग तज्ञ जुई सुहास आणि सह्याद्री क्रांती मळेगावकर यांना ‘तेजस्विनी’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. महिलांच्या कलागुणांना वाव देणारा पुणे नवरात्रौ महिला महोत्सव यंदा २२ वे वर्ष साजरे करत आहे. दरवर्षी प्रमाणे यंदा ही तेजस्विनी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागूल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

निर्मला जगताप, दीपिका बागूल आणि प्रांजली गांधी पत्रकार परिषदेस उपस्थित होत्या. हा महिला महोत्सव २८ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या कालावधीत होत. महोत्सवाचे उद्घाटन येत्या बुधवारी (ता. २८) लक्ष्मी माता मंदिर प्रांगण, मुक्तांगण शाळेजवळ, शिवदर्शन पुणे येथे दुपारी एक वाजता अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी तेजस्विनी पुरस्कार वितरण सोहळा देखील पार पडेल. दरवर्षी विविध क्षेत्रातील ज्येष्ठ व तरुण अशा दोन कर्तबगार महिलांना या महिला महोत्सवात उद्घाटन प्रसंगी तेजस्विनी पुरस्कार देऊन गौरविले जाते, अशी माहिती बागूल यांनी दिली.

हा महिला महोत्सव यशस्वी होण्यासाठी निर्मला जगताप, छाया कातुरे, दीपा बागूल, प्राजनी गांधी, विद्युलता साळी, योगिता निकम इत्यादी विशेष प्रयत्नशील आहेत. पुणे नवरात्री महिला महोत्सवाचे सकाळ आणि साम टीव्ही हे माध्यम प्रायोजक आहेत. या स्पर्धांमध्ये अंध, दिव्यांग आणि परदेशातूनही महिला स्पर्धक सहभागी होत आहेत. स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी 7972771937 किंवा 9881737246 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महोत्सवाच्या वतीने करण्यात आले आहे.

भाग्यलक्ष्मी स्पर्धांचे आयोजन -

पुणे नवरात्रौ महिला महोत्सवानिमित्त भाग्यलक्ष्मी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये होम मिनिस्टर, पाक कला आणि एकपात्री अभिनय स्पर्धांचा समावेश असून त्याचबरोबर श्रीसूक्त पठण, कण्यापूजन आणि महाआरती यांचे आयोजन करण्यात आले आहे. सलग पाच दिवस विविध स्पर्धा पार पडणार असून ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता महिलांसाठी लकी ड्रॉ आयोजित करण्यात आल्याचे यावेळी बागूल यांनी सांगितले.

Web Title: Pune Navratri Women Mahotsav Tejaswini Award Declare

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..