
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) माजी शहर अध्यक्ष दीपक मानकर यांचा मुलगा करण दीपक मानकर तसेच करण याचे सासरे सुखेन शाह यांच्यावर देखील बनावट दस्त तयार केल्याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. समर्थ पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात करण दीपक मानकर, शंतनू सॅम्युअल कुकडेसह इतरांवर गुन्हा दाखल आहे. याबाबत वरिष्ठ निरीक्षक उमेश गित्ते यांनी तक्रार दाखल केली आहे.