Pune : नऱ्हे गावात राष्ट्रवादी काँग्रेसचे जन आक्रोश आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NCP

Pune : नऱ्हे गावात राष्ट्रवादी काँग्रेसचे जन आक्रोश आंदोलन

धायरी : ईडी सरकारच करायचं काय--खाली डोके वर पाय, पन्नास खोके नॉट ओके बेरोजगार तरुणांना धोके, वेदांत प्रकल्प गुजरातला पाळविणाऱ्या शिंदे फडणवीस सरकारचा धिक्कार असो, पाणी आम्हाला मिळालेच पाहिजे,खड्डेमय  रस्ते त्वरित दुरुस्ती झालेच पाहिजे,इत्यादी घोषणा देत खा. सुप्रिया सुळे यांच्या सहित शेकडो राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले.तसेच रस्त्यावर तयार झालेल्या दीड फूट खड्ड्यात झाड लावू प्रशासनाचा निषेध नोंदविण्यात आला.

समाविष्ट गावातील कचरा, पाणी, रस्त्यावर झालेले मोठे खड्डे, महापलिकेकडून आकारण्यात येणारा टॅक्स यासाठी पुणे महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात सिंहगडरोड परिसरातील नऱ्हे गावातील वेताळ बाबा चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र जन आक्रोश आंदोलन करण्यात आले होते.

खडकवासला विधानसभा अध्यक्ष काकासाहेब चव्हाण,त्रिंम्बक मोकाशी, मा.सभापती प्रभावती भुमकर, मा. सरपंच पोपटराव खेडेकर, मा. उपसरपंच राजाभाऊ वाडेकर, राजश्री पाटील, सुप्रिया भुमकर, मा.प.स.सदस्या ललिता कुटे, नारायण इंगळे, दशरथ वाल्हेकर, नुरशेठ सय्यद,मा. नगरसेविका सायली वांजळे, स्मिता कोंढरे  इत्यादी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सुप्रिया सुळे म्हणाल्या,समाविष्ट गावातील कचरा, पाणी, रस्त्यावरील खड्डे ,टॅक्स व सर्व प्रश्नांसाठी  आपला कचरा, पाण्याचे हांडे घेऊन महापालिकेवर धडक देऊन जन आक्रोश आंदोलन करण्याची गरज निर्माण झाली आहे.

दादा पालकमंत्री असताना दर शुक्रवारी सर्व प्रश्न मार्गी लागायचे. त्यावेळी काही निधीही पडला होता.परंतु या सरकारने तो निधी थांबला आहे.

अडीच महिने आपल्याला पालकमंत्री नाही. किती तरी कोटी रुपयांचा निधी बंद केला आहे. समाविष्ट गावातील सर्व प्रश्नांसाठी लवकरच मुख्यमंत्री यांची भेट घेणार आहे.

Web Title: Pune Ncp Public Outcry Narhe Village

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..