esakal | Ajit Pawar | IT च्या कारवाईनंतर अजित पवारांच्या समर्थनार्थ पुण्यात मानवी साखळी
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar

IT च्या कारवाईनंतर अजित पवारांच्या समर्थनार्थ पुण्यात मानवी साखळी

sakal_logo
By
ओमकार वाबळे

अजित पवार यांच्याविरोधातील आयकर विभागाच्या कारवाईनंतर त्याचे पडसाद राज्यभरात उमटताना दिसत आहेत. आज पुण्यात मानवी साखळी करून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या कारवाईचा निषेध व्यक्त केला. राष्ट्रवादीच्या महिला विंग प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या ठिकाणी भाजपविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांशी संबंधित जरंडेश्वर साखर कारखाना असल्याची माहिती आयकर विभागाकडे आहे. या साखर कारखान्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत असतानाच आयकर विभागाने पवारांच्या बहिणी तसेच त्यांच्याशी निगडीत संस्थांवर छापे मारले. दोन दिवस हे धाडसत्र सुरू आहे.

यानंतर अजित पवारांच्या समर्थनार्थ पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मानवी साखळी केली. तसेच पवारांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. संबंधित कारवाई सुडबुद्धीने झाल्याचं राष्ट्रवादीच्या महिला नेत्या रुपाली चाकणकर म्हणाल्या.

loading image
go to top