

Pune Paper Leak News NCRA Work Assistant Recruitment Candidate Booked Under Official Secrets Act for Sharing Exam Paper Photos
esakal
पुणे : रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्स' संस्थेच्या 'वर्क असिस्टंट' पदाच्या परीक्षा प्रक्रियेदरम्यान प्रश्नपत्रिकेचा संच व्हॉट्सॲपद्वारे इतरांना पाठवून गोपनीय माहिती बेकायदेशीररित्या उघड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका उमेदवाराविरुद्ध 'ऑफिशिअल सिक्रेट ॲक्ट' (शासकीय गुपिते अधिनियम) अंतर्गत चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.