Pune Latest News: पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण अकादमीमध्ये शुक्रवारी सकाळी एका १८ वर्षीय कॅडेटचा मृतदेह आढळला. अंतरिक्ष कुमार सिंग (वय १८) असे मृत कॅडेटचे नाव आहे. अंतरीक्ष हा उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील रहिवासी होता. .अंतरिक्ष सिंगचा मृतदेह सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास त्याच्या वसतिगृहाच्या खोलीत आढळला. माहिती मिळताच उत्तम नगर पोलीस ठाण्याचे पथक तपासणीसाठी एनडीए येथे दाखल झाले होते. पोलीस उपायुक्त संभाजी कदम म्हणाले की, "रॅगिंगबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. तपास सुरु असून कुठलीही सुसाईड नोट सापडलेली नाही.".8th Pay Commission: खुशखबर! दिवाळीपर्यंत आठव्या वेतन आयोगाची घोषणा? शिफारशी लवकरच लागू होणार.डिफेन्स पीआरओकडून काढण्यात आलेल्या निवेदनात म्हटलंय की, दैनंदिन प्रशिक्षणासाठी अनुपस्थित राहिल्यानंतर सहकारी कॅडेट्सना तो त्याच्या रुममध्ये पडलेला अचेतन अवस्थेत आढळला. त्याला तातडीने खडकवासला येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र सकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं..8th Pay Commission: खुशखबर! दिवाळीपर्यंत आठव्या वेतन आयोगाची घोषणा? शिफारशी लवकरच लागू होणार.हा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याच्या तपासासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले आहेत. मृताचे कुटुंबिय पुण्यात पोहोचल्यानंतर या प्रकरणात काय घडतं, हे पाहाणं महत्त्वाचं आहे. सध्या तरी मृत्यूबाबत कोणताही ठोस सुगावा लागलेला नाही..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.