

NDA Graduation Ceremony
Sakal
पुणे : ‘‘आधुनिक युद्ध आता केवळ रणांगणापुरते मर्यादित नसून, ते विचार, नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाच्या पातळीवरही लढले जात आहे. त्यामुळे एखाद्या राष्ट्राची महानता त्याच्या संपत्तीत नसून बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या क्षमतेत आहे. या वेगाने बदलणाऱ्या जगात भारत कोणत्या दिशेने पुढे जाईल, हे भविष्यातील तुमच्यासारख्या अधिकाऱ्यांवर अवलंबून असेल. त्यामुळे ज्ञान, कौशल्य आणि सजगता यांनी स्वतःला सतत सक्षम ठेवणे आवश्यक आहे,’’ असे प्रतिपादन केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष डॉ. अजय कुमार यांनी केले.