esakal | Pune: १६ ते २९ ऑक्टोबर दरम्यान पुणे विमानतळ २४ तास बंद
sakal

बोलून बातमी शोधा

take off

१६ ते २९ ऑक्टोबर दरम्यान पुणे विमानतळ २४ तास बंद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : धावपट्टीच्या दुरुस्तीचे काम करायचे असल्यामुळे लोहगाव विमानतळ १६ ते २९ ऑक्टोबर दरम्यान २४ तास बंद राहणार आहे. या काळात प्रवाशांना मुंबई किंवा हैदराबाद विमानतळावरून ये-जा करावी लागेल.

लोहगाव विमानतळाच्या धावपट्टीच्या दुरुस्तीचे काम अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे. या पूर्वीही विमानतळ बंद ठेवण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु, त्यावेळी काम झाले नव्हते. या पार्श्वभूमीवर आता १६ ते २९ ऑक्टोबर दरम्यान धावपट्टीच्या दुरुस्तीचे काम करायचे असल्याचे हवाई दलाकडून विमानतळाला मंगळवारी सांगण्यात आल्याची माहिती विमानतळाचे संचालक संतोष ढोके यांनी दिली.

लोहगाव विमानतळाच्या विस्तारीकरणाचे काम सध्या सुरू असल्यामुळे हा विमानतळ १२ तासच खुला आहे. सकाळी ८ ते रात्री ८ दरम्यान विमानतळावरून उड्डाणे होतात. सुमारे एक वर्षांपासून हे काम सुरू आहे. आता धावपट्टीच्या दुरुस्तीचे काम करायचे असल्यामुळे विमानतळ पूर्णतः बंद ठेवावा लागणार आहे. त्यामुळे प्रवाशांना मुंबई किंवा हैदराबादहून नियोजीत स्थळी प्रवास करावा लागेल. लोहगाव विमानतळावरून सध्या दररोज ५८ ते ६० विमानांची वाहतूक होते. त्यातून सुमारे १२ ते १५ हजार प्रवाशांची वाहतूक होते. पुणे विमानतळ देशातील सुमारे २५ शहरांशी जोडले गेलेले आहे.

लोहगाव विमानतळाच्या विस्तारीकरणाबाबत तसेच कार्गो विमानतळ सुरू करण्याबाबत खासदार गिरीश बापट यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची तीन दिवसांपूर्वी भेट घेऊन त्यांनायात लक्ष घालण्याची विनंती केली होती. गडकरी यांनी या बाबत दिल्लीत लवकरच बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले आहे. विमानतळाच्या विस्तारीकरणाचे काम पूढील वर्षी ऑगस्टमध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे.

loading image
go to top