

boy died in dog attack in bhor
ESakal
नसरापूर : केंजळ ता.भोर येथे धक्कादायक घटना घडली आहे. भोर येथे शिवारात ऊसतोडीचे काम करणाऱ्या ऊसतोड कामगाराच्या कुटुंबातील पाच वर्षीय बालक ऊस तोड चाललेल्या शेताजवळच गंभीर जखमी अवस्थेत आढळल्याचे समोर आले आहे. यानंतर मृत मुलाच्या पालकांनी तातडीने भोर येथील रुग्णालयात नेले, परंतु उपचारापुर्वीच त्याचा मृत्यु झाल्याचे निदर्शनास आले. या घटनेबाबत वन्य प्राण्याकडून हल्ला झाला की अन्य याबाबत वनविभाग नसरापूर व राजगड पोलिस तपास करत आहेत.