संजय काकडेंची मेधा कुलकर्णींना फोनवरुन धमकी

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 24 जून 2017

ऑडिओ क्लिप पोचली मुख्यमंत्र्यांपर्यंत

पुणे : पुण्याचे राज्यसभेचे खासदार संजय काकडे यांनी एका प्रकरणावरुन कोथरुडच्या आपल्याच पक्षाच्या महिला आमदार मेधा कुलकर्णी यांना फोनवरुन धमकी दिल्याची आणि शिवीगाळही केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी 'सरकारनामा'ला दिली आहे. सुमारे चार दिवसांपूर्वी हा प्रकार घडला आहे. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मेधा कुलकर्णी यांनी हे संपूर्ण संभाषण रेकाॅर्ड केले असून ते मुख्यमंत्र्यांकडे पाठवले आहे.

कोपरे गावाच्या पुनर्वसनाच्या प्रकरणात सुरु असलेल्या आंदोलनात मेधा कुलकर्णी यांनी आंदोलकांची बाजू घेतल्याच्या कारणावरुन हा प्रकार घडल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले आहे. नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या विस्तारासाठी कोपरे गावाचे पुनर्वसन करण्यात आले, विकासक म्हणून पुनर्विकासाची जबाबदारी संजय काकडे यांना देण्यात आली होती. मात्र, गेल्या सोळा वर्षांपासून हे पुनर्वसन झालेच नाही. या पुनर्वसनात डावलले गेलेल्या १५ जणांना सोबत घेऊन काही दिवसांपासून काकडे यांच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. जी लोक घरे मागत आहेत त्यांची नावे पुनर्वसनाच्या यादीत नव्हती अशी भूमिका संजय काकडें यांनी मांडली आहे.

कोपरे गामस्थांपैकी काही ग्रामस्थांनी कोथरुडच्या आमदार मेधा कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला होता. त्यावेळी या नागरिकांच्या बाजूने पूर्णपणे उभे राहण्याची भूमिका मेधा कुलकर्णी यांनी घेतली होती. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या काकडे यांनी मेधा कुलकर्णी यांना फोन करुन अश्लाघ्य भाषेत बोलत 'बघून घेईन,' अशी धमकी दिल्याचे सूत्रांकडून समजले. दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयातल्या अधिकाऱ्यांनाही काकडेंकडून याच प्रकारची वागणूक मिळाल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune news bjp mp sanjay kakade threat medha kulkarni