Pune News
Pune News

Pune News : नगर रस्त्यावर पलटी झालेला टँकर अजुनही 'जैसे थे'; स्थानिकांची तेल घेण्यासाठी धावपळ

Published on

वडगाव शेरी : अहमदनगरकडे मोहरीचे खाद्यतेल घेऊन जाणारा पंचवीस हजार लिटरचा एक टँकर नगर रस्त्यावर खराडी येथील बीआरटी मार्गात पलटी झाला. टँकर बीआरटी मार्गात अडकल्यामुळे त्याला तब्बल तीन क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. दहा तास उलटून गेल्यानंतरही हा टँकर हटवता आलेला नाही.

Pune News
Ahmednagar news : आमदारसाहेबांचा एक फोन अन् श्रद्धाच्या आयुष्याला मिळाली कलाटणी

या अपघतात नगर महामार्गावर पाच हजार लिटर तेलाची गळती होऊन वाहतूक कोंडी झाली. तब्बल दहा तासानंतरही टँकरला सरळ करण्यात प्रशासनाला यश आलेले नाही. ज्वलनशील पदार्थ असलेला हा टँकर तब्बल दहा तासापासून मोठी रहदारी असलेल्या नगर रस्त्यावर आडवा पडून आहे.

दरम्यान टँकरमधून गळती झालेले तेल भरून नेण्यासाठी स्थानिकांची गडबड सुरू आहे. नागरिक रस्त्यावर सांडलेले तेल भांड्यांमध्ये भरून नेताना दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com