Pune News : लोहगावातील तलाठी, मंडलाधिकारी यांच्या विरोधात तक्रार दाखल

लोहगाव येथील तलाठी आणि मंडलाधिकाऱ्यांकडून तुकडे बंदी कायद्याचे उल्लंघन झाले असल्याची तक्रार मा. जिल्हाधिकारी यांचेकडे करण्यात आली आहे. याबाबत चौकशी करून कारवाई करावी असा तक्रारी अर्ज ॲड. शरद बांदल यांनी केला आहे.
crime news
crime newssakal

Pune News : लोहगाव येथील तलाठी आणि मंडलाधिकाऱ्यांकडून तुकडे बंदी कायद्याचे उल्लंघन झाले असल्याची तक्रार मा. जिल्हाधिकारी यांचेकडे करण्यात आली आहे. याबाबत चौकशी करून कारवाई करावी असा तक्रारी अर्ज ॲड. शरद बांदल यांनी केला आहे.

तक्रारदार यांनी अर्जात नमूद केले आहे की, लोहगाव येथील तलाठी उषा मुंडे तसेच मंडलाधिकारी सत्यवान लांडगे यांनी सामाईक खरेदी क्षेत्राच्या सातबारा दप्तरी स्वतंत्र नोंदी करुन तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन केले आहे.

तसेच या कामात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याची तक्रारही तक्रारदार यांनी केली आहे. तसेच याबाबत तातडीने चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. यासंदर्भात मंडलाधिकारी सत्यवान लांडगे यांचेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.

crime news
Pune Fire Accident : कशी लागली भाऊ रंगारी गणपतीसमोरील जुन्या वाड्याला आग?

हा गैरप्रकार अनेक दिवसापासून सुरु असून पैसे घेऊन तुकडे बंदी कायद्याचे उल्लंघन केले जात आहे. तसेच बेकायदेशीर नोंदी केल्याबाबतचे आपल्याकडे पुरावे आहेत.

- ॲड. शरद बांदल, तक्रारदार

तक्रारदार यांच्या तक्रारीमध्ये काहीही तथ्य नसून, आम्ही कोणत्याही प्रकारचे नियमबाह्य काम केलेले नाही. तसेच याबाबत चौकशी झाल्यास त्यास पुर्ण सहकार्य करु.

- उषा मुंडे, तलाठी लोहगाव

crime news
Nashik Crime : सोशल मीडियावरील त्या आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी गुन्हा दाखल! उपनगर नाक्यावर रास्तारोको करणाऱ्या चौघांना अटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com