esakal | Pune: मालक लघुशंकेसाठी उतरताच चालकाने पळविले ९७ लाख
sakal

बोलून बातमी शोधा

crime

पुणे : मालक लघुशंकेसाठी उतरताच चालकाने पळविले ९७ लाख

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

येरवडा : कल्याणीनगर येथे मोटारीचा मालक लघुशंकेसाठी उतरल्यानंतर चालकाने मोटार पळविली. थोड्या अंतरावर गेल्यानंतर चालकाने मोटारीतील तब्बल ९७ लाख रूपये घेऊन मोटार जागेवर सोडून पळून गेला. आरोपी विजय माधव हलगुंडे (वय २२, रा. टिळेकरनगर, कात्रज-कोंढवा रस्ता) असे या आरोपीचे नाव असून त्याचा तपास करीत असल्याची माहिती येरवडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी युनूस शेख यांनी दिली.

फिर्यादी अशोक रघुवीर गोयल (वय ५०, रा. क्लोवर पॅराडाईज, कोंढवा ) हे सोमवारी रात्री साडे आठ वाजता चालक हलगुंडे यांच्यासह कल्याणीनगरकडे मोटारीने येत होते. त्यांनी मोटारीत पांढऱ्या कापडी पिशवीत ९७ लाख रूपये ठेवले होते. दरम्यान ते मुळा-मुठा नदीपात्रा जवळ लघुशंकेसाठी उतरले. त्याच वेळी संशयीत आरोपी चालक हलगुंडेने मोटार वेगाने पुढे नेली. काही अंतरावर गेल्यानंतर मोटार जागेवरच सोडून देऊन त्यातील ९७ लाख रूपये पळविले. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक रविंद्र आळेकर करीत आहेत.

loading image
go to top