सांडपाणी वाहिन्यांची दुरुस्ती

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 मे 2017

पुणे - पावसाळा तोंडावर आल्याने शहर आणि उपनगरांमधील सांडपाणी वाहिन्या (ड्रेनेज लाइन) आणि त्यावरील झाकणांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. ज्या भागातील चेंबरची झाकणे धोकादायक असतील, ती बदलण्याचे नियोजन असून, त्यासाठी सर्वत्र पाहणी करण्यात येणार आहे. 

तसेच, खोदाईनंतर ज्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली, त्या रस्त्यांवर पावसाळ्यात पाणी साचणार नाही, याचीही काळजी घेण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.   

पावसाळ्यापूर्वी साधारण महिनाभरआधी रस्त्यांची डागडुजी, पावसाळी गटारे, सांडपाणी वाहिन्या, त्यावरील झाकणांची कामे अपेक्षित असतात. त्यातील काही कामांसाठी आर्थिक तरतूदही करण्यात आली आहे; परंतु ही कामे होत नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय होण्याची शक्‍यता आहे.  त्यातच, अनेक भागातील सांडपाणी वाहिन्या आणि त्याची झाकणे पूर्णपणे नादुरुस्त आहेत. ही कामे निकृष्ट दर्जाची केली जात असल्याने हा प्रश्‍न निर्माण होत असल्याची तक्रार नगरसेवक नाना भानगिरे यांनी स्थायी समितीच्या बैठकीत केली. त्यावर पावसाळ्यापूर्वी करण्यात येणारी कामे प्राधान्याने करण्याच्या हालचाली संबंधित खात्याने सुरू केल्या आहेत. त्यानुसार येत्या ७ जूनपर्यंत रस्ते आणि सांडपाणी वाहिन्यांची दुरुस्ती होईल, असे सांगण्यात आले आहे. 

महापालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख राजेंद्र राऊत म्हणाले, ‘‘दरवर्षी पावसाळ्यात जी कामे अपेक्षित असतात, त्यानुसार करण्यात येणार आहेत. त्यात, प्रामुख्याने रस्त्यांची दुरुस्ती, सांडपाणी वाहिन्यांचा समावेश आहे. या काळात नेमक्‍या कोणत्या भागातील काय कामे करावयाची आहेत, याचा आराखडा तयार केला आहे. त्यानुसार केल्या काही दिवसांपासून ती करण्यात येत आहेत. पावसाळा सुरवात होणाऱ्यापूर्वी ती कामे संपविण्यात येतील.’’

‘कामे वेळेत संपवा’
पावसाळा सुरू होण्यासाठी जेमतेम १० ते १२ दिवसांचा अवधी राहिला असल्याने शहरातून वाहणाऱ्या नाल्यांची साफसफाई प्राधान्याने करण्यात येईल. नाल्यांतील कचरा काढण्याची कामे हाती घेतली आहेत. ज्यामुळे पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होणार नाही. त्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या असून, वेळेत कामे संपविण्याचा आदेश दिला आहे, असेही महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.

Web Title: pune news dranage water repairing