Pune News : मागील ४८ वर्षांपासून एकही खड्डा न पडलेला जंगली महाराज रस्ता उकरणार; कारण...

JM Road
JM Road

पुणे : ‘‘१४ ऑक्टोबर २०२२ रोजी मुसळधार पाऊस पडला अन बघता बघता डेक्कन जिमखाना, जंगली महाराज रस्ता, गोपाळकृष्ण गोखले रस्त्यावर भयानक पूर स्थिती निर्माण झाली होती. स्मार्ट सिटी अंतर्गत कोट्यावधी रुपये खर्च करून ही स्थिती ओढावल्याने नागरिकांनी महापालिकेवर संताप व्यक्त केलाच होता. आता असा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी या भागात पावसाळी गटारांची क्षमता वाढविण्यासाठी पाच कोटी रुपयांचा आराखडा मलःनिसारण विभागाने तयार केला आहे.

JM Road
अवकाळीमुळे १० कोटींचे नुकसान! पिकांच्या हानीचा अहवाल आयुक्तांना सादर; आता भरपाई...

यातून या दोन्ही रस्त्यावर चेंबर तयार करणे, पादचारी मार्गावर पावसाळी गटारासाठी पाइप टाकणे अशी कामे केली जाणार आहेत. पण ‘गेल्या ४८ वर्षापासून एकही खड्डा पडला नाही अशी खाती असणाऱ्या जंगली महाराज रस्त्यावर जेसीबी चालविण्याची नामुष्की ओढवणार आहे.

डेक्कन जिमखाना परिसर, जंगली महाराज रस्ता, गोपाळ कृष्ण गोखले रस्ता (फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता) या भागात वेताळ टेकडी, फर्ग्युसन महाविद्यालयामागील टेकडी येथून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून येते. गेल्या काही वर्षात कमी वेळेत जास्त पाऊस पडण्याचे प्रमाण वाढल्याने शहराच्या अनेक भागात पाणी तुंबत आहे. त्याचा सर्वाधिक फटका या भागात बसत आहे. गेल्यावर्षी आॅक्टोबर महिन्यात मुसळधार पाऊस झाल्यानंतर तीन ते चार वेळा जंगली महाराज रस्त्यावर गुडघ्याऐवढे पाणी जमा झाले.

त्यामध्ये बालगंधर्व पासून डे डेक्कन कॉर्नरपर्यंतच भाग पाण्याखाली होती, तसेच गोखले रस्त्यावर हॉंगकॉंग गल्लीच्या दोन्ही बाजूने भयानक स्थिती निर्माण झाली. गोखले रस्त्यावरील दुकानांमध्ये पाणी घुसले, वाहतूक ठप्प झाली होती. यापूर्वी अशी स्थिती कधीच निर्माण झाली नव्हती. स्मार्ट सिटीच्या अंतर्गत दोन्ही रस्त्यांवर २५ कोटी रुपये खर्च पादचारी मार्ग करताना जी पावसाळी गटारांची व्यवस्था केली ती कमी क्षमतेची असल्याचे समोर आले. त्यामुळे येथे सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे.

JM Road
Sambhaji Chhatrapati : राज्यातील पक्षांसमोर नवं आव्हान ; स्वराज्य संघटनेचा सर्व निवडणुका लढवण्याचा ठराव मंजूर!

यामुळे तुंबते पाणी

- बालगंधर्व रंगमंदिर, संभाजी उद्यान आणि डेक्कन जिमखाना येथे मेट्रोतर्फे काम करताना पावसाळी गटार तुटले आहेत.

- त्यामुळे गेल्यावर्षी या दोन्ही रस्त्यावरील पावसाची पाणी वाहून जाण्यात अडथळा आला.

- चेंबरवर सिमेंट व फायबरच्या जाळ्या बसविल्याने पाणी वाहून जाण्याची क्षमता कमी झाली.

- जंगली महाराज रस्त्यावर संभाजी उद्यानाच्या बाजूने पावसाळी गटाची व्यवस्था नाही.

- बालगंधर्व ते डेक्कन पर्यंत जंगली महाराज रस्‍त्यावर व पादचारी मार्गावर समांतर पावसाळी गटारे आहेत, पण ही यंत्रणा अपुरी

नव्या आराखड्याप्रमाणे काय होणार

- जंगली महाराज रस्त्यावरील पाणी वाहून जाण्यासाठी डेक्कनकडे जाताना डाव्या बाजूने व गोखले रस्त्यावर काका हलवाईच्या बाजूने रस्त्यावर चार ठिकाणी ३ बाय३ चे मोठे चेंबर तयार करणार

- हे चेंबर ६०० मीमी व्यासाचे पाइप टाकून किंवा चर काढून त्यावर लोखंडी जाळून टाकून पादचारी मार्गावरील पावसाळी गटारांशी जोडणार

- त्यामुळे पाणी वाजून जाण्याची क्षमता वाढणार

- बालगंधर्व रंगमंदिर, संभाजी उद्यानात तुटलेले पावसाळी गटार दुरुस्त करून नवे पाइप टाकणार

- हाँगकाँग लेन ते नदीपात्र अशी भूमीगत लाईन टाकणार

या ठिकाणी होणार रस्त्यावर खोदकाम

पुणे महापालिकेने १९७५ मध्ये अतिशय उत्तम दर्जाचा जंगली महाराज रस्ता तयार केला. तेव्हापासून आज पर्यंत या रस्त्यावर खड्डे पडलेले नाहीत, त्यावर पॅचवर्क नाही, त्यावरील खडी कधीही निघून जात नाही. त्यामुळे उत्तम कामाचा नमुना म्हणून या रस्त्याचे महत्त्व आहे. पण आता आपटे रस्त्यावर जमा होणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी या रस्त्यावर सुमारे 30 ते 35 फूट लांबीच्या रस्त्यावर खोदकाम करण्याची नामुष्की येणार आहे.

यासाठी कोहिनूर हॉटेलपासून प्रयाग हॉस्पिटल ते जंगली महाराज रस्त्यावर भोसले शिंदे आर्केड अशी ४०० मीटर लांबीची ९०० मीमी व्यासाची नवी पावसाळी गटार टाकले जाणार आहे. शिंदे आर्केडच्या विरुद्ध बाजूस नवे चेंबर तयार करून तेथील भूमीगत नाल्याला हे पाइप जोडले जातील. पण हे काम करताना जंगली

महाराज रस्त्यावर खोदकाम करावे लागणार आहे. त्यामुळे एकही खड्डा नाही असा जंगली महाराज रस्ता जेसीबीने तोडला जाईल. तसेच चेंबरसाठी खड्डे करावे लागणार आहेत.

‘‘डेक्कन जिमखाना, गोखले रस्ता, जंगली महाराज रस्ता येथील पावसाळी गटारांची क्षमता वाढविण्यात येणार आहे. त्यासाठी ५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षीत असून, त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यास सुरवात केली आहे. यामध्ये नवे पाइप टाकणे, रस्त्यावर चेंबर तयार केले जाणार आहेत. या कामासाठी सहा महिने वेळ लागणार आहे.’’

- श्रीधर येवलेकर, कार्यकारी अभियंता, मलःनिसारण विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com