
पुणे -वारंवार स्वच्छ पाण्याने हात धुणे, मास्क, सॅनिटायझर वापरणे आणि सोशल डिस्टन्सिंग, ही आता आपल्या जीवनाची चतुःसूत्री आहे. या गोष्टी सतत स्मरणात ठेवाव्या लागतील. कारण लॉकडाउननंतर कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
पुढील काही दिवसांनी देशातील नागरिकांची लॉकडाउनमधून काही प्रमाणात सुटका होईल. तेव्हा आपण सगळे सर्वत्र मोकळेपणाने फिरू लागू. परंतु, त्याच वेळी कोरोनाचा अधिक तीव्र उद्रेक होऊ शकतो. त्यासाठी सर्वांना सज्ज राहावे लागेल, असे जनरल प्रॅंक्टिशन असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. रूपा अगरवाल यांनी सांगितले.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
सामुदायिक प्रतिकारक्षमता म्हणजे...
मोठ्या प्रमाणातील लोकसंख्येला झालेल्या जंतुसंसर्गामुळे त्यांच्या शरीरामध्ये तयार झालेल्या प्रतिकारशक्ती (अँटिबॉंडिज) आणि विविध लसींमुळे या संसर्गाला आळा बसण्यास मदत होते. यालाच सामूहिक प्रतिकारक्षमता म्हणतात. जितक्या जास्त प्रमाणात हा संसर्ग होईल तितकी प्रतिकारक्षमता अधिक आणि साथीचा फैलाव कमी होता, असे तज्ज्ञांचे मत आहे.
स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी...
- सोशल डिस्टन्सिंगचे पालन
- घराबाहेर मास्क वापरणे
- वारंवार स्वच्छ पाण्याने हात धुणे
- सॅनिटायझर वापरणे
- घराबाहेर पडणे टाळावे
लॉकडाउननंतर काम सुरू करताना...
-शक्यतो घरूनच काम करण्याचा प्रयत्न करावा
-स्वतःचे काम स्वतःच करण्याचे प्रयत्न करावेत, नोकर किंवा मदतनीसांवर अवलंबून राहू नये
-सहकार्ऱ्यांशी बोलण्यासाठी किंवा चहा-कॉफी घेण्यासाठी वारंवार मास्क वर-खाली करणे टाळावे
- शक्यतो जिन्यांचा वापर करावा आणि लिफ्टचा वापर टाळावा.
- कामाचा टेबल, खुर्चीची स्वच्छता करावी.
- एसीचा वापर टाळावा. नैसर्गिक खेळत्या हवेसाठी खिडक्या उघडाव्यात.
- जेवण, पाणी घरूनच आणावे. बाहेरचे पदार्थ खाणे टाळावे
- हस्तांदोलन टाळावे
घरी आल्यानंतर...
-पादत्राणे घराबाहेरच ठेवा
- बॅग, पर्स, किल्ल्या आदी गोष्टी दाराजवळ एका बाजूस सुरक्षित ठेवा
-घरी आल्यावर अंघोळ करा
-घरी आल्यावर कपडे त्वरित बदलावेत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.