
पुण्यातील भोर येथील भाटघर धरणाभोवती काही ठिकाणी अचानक पाण्याचा हिरवा रंग आल्याने स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. धरणाच्या बॅकवॉटर क्षेत्रातील संगमनेर, माळवाडी आणि नान्हे गावातील तलावांमध्ये हा बदल स्पष्टपणे दिसून येत आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याची सुरक्षितता, शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याची प्रभावीता आणि नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, अशी चिंता स्थानिक लोकांनी व्यक्त केली आहे.