पुण्यात होतोय जनतेच्या पैशांचा चुराडा ?

संदीप जगदाळे
Saturday, 11 November 2017

हडपसर (पुणे): दहा इंची जूनी सांडपाणी वाहिनी सुस्थितीत असताना त्याठिकाणी गरज नसताना पून्हा 12 इंची वाहिनी टाकण्याचे काम भाजपा नगरसेवक करत आहे. खोदकामामुळे रसत्यावरील ब्लॅाक काढले गेले आहेत. त्यामुळे रस्ता खराब झाला आहे. गरज नसताना हे काम केले जात आहे. त्यामुळे जनतेच्या पैशांचा चुराडा होत आहे. त्यामुळे हे काम तातडीने थांबवावे, याबाबतचे लेखी निवेदन नगरसेविका वैशाली बनकर यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहे.

बनकर म्हणाल्या, 'प्रभाग 23 मध्ये लक्ष्मीनारायण कॅालनीमध्ये 2004 साली दहा इंची सांडपाणी वाहनी टाकली होती. त्यातून व्यवस्थीत सांडपाण्याचा निचरा होतो. दरवर्षी या वाहिनीतील गाळ काढला जातो. केवळ दोन चेंबर खराब झाले आहेत. त्याची दुरूस्ती करता येते. त्यासाठी नव्याने लाईन टाकणे चुकीचे आहे. जर लाईन टाकायची होती तरी भविष्य काळातील गरज ओळखून त्याठिकाणी 16 इंची वाहिनी टाकायला हवी होती. केवळ 12 इंची लाईन टाकून फायदा होणार नाही. भाजपचे नगरसेवक मारूती तुपे सत्तेत आहेत. त्यांना जादा निधी मिळाल्याने गरज नसताना निधी खर्च केला जात आहे. पालिका अधिका-यांनी याठिकाणी पहाणी करून लेखी ऑडीट रिपोर्ट सादर करेपर्यंत हे काम थांबवावे याबाबतचे लेखी निवेदन आयुक्तांना दिले आहे.'

नगरसेवक मारूती तुपे म्हणाले, 'सदर सांडपाणी वाहिनीला योग्य उतार नव्हता. सतत ती तुंबत असल्याच्या लेखी तक्रारी स्थानिक नागरिकांनी केल्या होत्या. नागरिकांच्या सूचनेनुसार हे काम करत आहे. अधिका-यांनी देखील येथे पाहणी केल्यानंतरच प्रत्यक्ष कामाला सुरवात केली आहे. बनकर यांनी सन 15-16 व 16-17 मध्ये याठिकाणी रसत्याच्या कामासाठी निधी टाकला होता. हा निधी त्यांनी अन्यत्र वळविला. कारण या भागात त्यांचे विरोधक राहतात. त्यांची कामे करावयाची नाहीत, त्यामुळे केवळ सुडबुध्दीने बनकर या कामाला विरोध करून येथील रहिवाशांची अडवणूक करत आहेत. हे काम पूर्ण झाल्यानंतर येथे सिंमेटचा रस्ता तयार करण्यासाठी मी निधी देखील मंजूर करून घेतला आहे.'

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune news hadapsar ncp bjp corporator politics