Sun, October 1, 2023

Pune News : सहायक पोलिस आयुक्त विजयकुमार पळसुले यांची अंतर्गत बदली
Published on : 1 June 2023, 3:55 pm
पुणे : शहर पोलिस दलातील आर्थिक व सायबर गुन्हे शाखेतील सहायक पोलिस आयुक्त विजयकुमार पळसुले यांची अंतर्गत बदली करण्यात आली आहे.
तसेच, शहर पोलिस दलात बदली होऊन आलेल्या तीन सहायक पोलिस आयुक्तांना विविध विभागांमध्ये पदभार सोपविण्यात आला आहे. या संदर्भात पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी बुधवारी रात्री आदेश जारी केले आहेत.
सहायक पोलिस आयुक्तांचे नाव आणि बदलीचे ठिकाण-
विजयकुमार पळसुले- आर्थिक व सायबर गुन्हे शाखा पुणे ते आस्थापना, पुणे शहर.
जगदीश सातव - ठाणे शहर ते वाहतूक शाखा, पुणे शहर.
अप्पासाहेब शेवाळे- पोलिस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा ते आर्थिक व सायबर गुन्हे शाखा, पुणे शहर.
शाहूराव साळवे- ठाणे शहर ते वानवडी विभाग, पुणे शहर.