चपातीचा आकार ठरला घटस्फोटाचे एक कारण...

अश्विनी जाधव-केदारी
बुधवार, 28 मार्च 2018

पुणे: पुण्यात एक अनोख्या कारणामुळे चक्क घटस्फोटासाठी एक अर्ज दाखल झाला आहे, चपातीचा आकार हे एक प्रमुख कारण ठरले आहे. एका माहिती तंत्रज्ञान कंपनीत काम करत असलेल्या अभियंत्याने  चपातीच्या आकारावरुन तसेच दैनंदिन जीवनातील प्रत्येक गोष्ट प्रोटोकॉल नुसार व्हावी न झाल्याने कौटुंबिक हिंसाचार केल्याचा दावा, पत्नीने केला आहे. त्यामुळे पतीची मारहाण, शिवीगाळ याला कंटाळून पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज केला आहे.

दहा वर्षांपूर्वी म्हणजेच 2008 मध्ये दोघांचा विवाह झाला. मात्र, आयटी क्षेत्रात असलेला पती अती काटेकोर असल्याचे पत्नीचं म्हणणे आहे. दिवसभरात काय काय केलं, ते एक्सेल शीटमध्ये वेगवेगळ्या रंगात करण्यास सांगत असे. जर ते केले नसेल, तर त्याचे कारण लिहिण्यासाठी एक कॉलम असे. तो ही भरला नाही तर शिवीगाळ, घालून-पाडून बोलणे आणि मारहाण होत असे, असं पत्नीचे म्हणणे आहे. इतकंच नाही तर चपातीचा आकार विशिष्टच असला पाहिजे. चपाती 20 सेमीचीच व्हायला हवी. त्या आकाराची चपाती झालीय की नाही हे तो मोजत असे, असाही दावा तिने केला आहे.

दरम्यान, याप्रकरणी माध्यमांसमोर बोलण्यास संबधित महिलेने नकार दिला आहे. या महिलेचा पती बंगळूरू यथे एका आयटी कंपनीत काम करत आहे. याशिवाय क्रूरतेची हद्द म्हणजे थंड पाणी अंगावर ओतून, एसी असलेल्या खोलीत मला कोंडून ठेवत असे, असाही दावा पत्नीने केला आहे. त्याने मला अनेकवेळा आत्महत्या करण्यासाठी दबाव आणला, मात्र कारण आम्हाला एक मुलगी असल्याने मी ते पाऊल उचललं नाही, असेही पत्नीने म्हटले आहे. दरम्यान, याप्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास पतीने मात्र नकार दिला.

Web Title: pune news it husbund divorce wife over size of chapatis