

Loni Kalbhor Police Rescue Woman in Crisis at Theur Bridge
Sakal
सुनील जगताप
थेऊर : थेऊर येथे मुळा - मुठा नदीचे पुलावरून आर्थिक अडीअडचणीमुळे नदीपात्रात उडी मारुन आत्महत्या करण्याच्या तयारीत असलेल्या महिलेला लोणी काळभोर पोलीसांनी कर्तव्य तत्परता दाखवत प्राण वाचविले आहेत.वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवार ९ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारांस लोणी काळभोर पोलीस ठाणे अंतर्गत थेऊर पोलीस चौकीत एक इसम धावत धावत आला व त्याने घाबरलेल्या अवस्थेत थेऊर - कोलवडी नदीचे पुलावरून एक महिला जीव देण्याचे मनस्थितीत उभी आहे.