'मर्ढे व्हावे कवितेचे गाव आणि वाङ्मयीन पर्यटनस्थळ'

स्वप्निल जोगी
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, '' महाबळेश्वर येथे १८ मार्च २०१७ रोजी झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत मर्ढे हे गाव कवितेचे गाव म्हणून विकसित करावे आणि त्याला वाङ्मयीन पर्यटन स्थळाचा दर्जा मिळावा, असा ठराव सातारा जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकीहाळ, विनोद कुलकर्णी आणि सोपानराव चव्हाण यांनी मांडला होता. त्याला कार्यकारी मंडळाने एकमताने मंजुरी दिली. 

पुणे : आधुनिक मराठी कवितेचे जनक आणि युगप्रवर्तक कवी बा. सी. मर्ढेकर यांचे जन्मगाव असलेल्या मर्ढे (जि. सातारा) या गावाला कवितेचे गाव म्हणून विकसित करताना तिथे गेल्या सातशे वर्षातली प्रातिनिधिक मराठी कविता कवींच्या परिचयासह कोरली जावी आणि या गावाला वाड्मयीन पर्यटनस्थळ म्हणून घोषित करावे, या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या मागणीला राज्य सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. हा प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयाने पुढील कार्यवाहीसाठी सांस्कृतिक आणि पर्यटन विभागाकडे पाठविला आहे.

परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, '' महाबळेश्वर येथे १८ मार्च २०१७ रोजी झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत मर्ढे हे गाव कवितेचे गाव म्हणून विकसित करावे आणि त्याला वाङ्मयीन पर्यटन स्थळाचा दर्जा मिळावा, असा ठराव सातारा जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकीहाळ, विनोद कुलकर्णी आणि सोपानराव चव्हाण यांनी मांडला होता. त्याला कार्यकारी मंडळाने एकमताने मंजुरी दिली. 

मुख्यमंत्र्यांनी पुढील कार्यवाहीसाठी हा प्रस्ताव सांस्कृतिक आणि पर्यटन विभागाकडे पाठविला आहे. अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून कळविण्यात आली आहे. मर्ढे गाव वाङ्मयीन पर्यटनस्थळ म्हणून घोषित झाल्यास या गावाच्या विकासाला चालना मिळेल."

Web Title: Pune news Maharashtra Sahitya Parishad