मोदींच्या कविता आता मराठीत 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जुलै 2017

पुणे - 
वंदे मातरम्‌... 
हे शब्द नव्हेत, 
हा तर मंत्र आपुला 
स्वातंत्र्याचा ऊर्जेचा श्‍वास आपुला... 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लेखणीतून उतरलेल्या या आणि अशा अनेक गुजराती भाषेतील कविता आता मराठीत अनुवादित झाल्या आहेत. यानिमित्ताने मोंदीच्या व्यक्तिमत्त्वातील आणखी एक पैलू नव्याने वाचकांसमोर येत आहे. 

पुणे - 
वंदे मातरम्‌... 
हे शब्द नव्हेत, 
हा तर मंत्र आपुला 
स्वातंत्र्याचा ऊर्जेचा श्‍वास आपुला... 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लेखणीतून उतरलेल्या या आणि अशा अनेक गुजराती भाषेतील कविता आता मराठीत अनुवादित झाल्या आहेत. यानिमित्ताने मोंदीच्या व्यक्तिमत्त्वातील आणखी एक पैलू नव्याने वाचकांसमोर येत आहे. 

मोदींचे भाषेवर, साहित्यावर प्रेम आहे, हे सर्वांना माहिती आहेच. त्यांचा 2007 मध्ये "आंख आ धन्य छे' हा काव्यसंग्रहदेखील प्रकाशित झाला होता. त्यात 67 कवितांचा समावेश आहे. या संग्रहाचा कोलंबिया विश्‍वविद्यालयाच्या माजी प्राध्यापिका डॉ. अंजना संघीर यांनी "आँख ये धन्य हैं' या नावाने हिंदी भाषेत अनुवाद केला. पुढे हा संग्रह सर्व भारतीय भाषांत प्रकाशित करण्याचाही त्यांनी निर्णय घेतला. त्यानुसार हा संग्रह आता "नयन हे धन्य रे!' या नावाने मराठी भाषेत येत असून, गुजरातमधील जयश्री जोशी यांनी तो अनुवादित केला आहे. पुण्यातील उत्कर्ष प्रकाशन संस्थेतर्फे तो प्रकाशित केला आहे. 

जोशी म्हणाल्या, ""माझा जन्म गुजरातचा. माझे शालेय शिक्षण गुजराती भाषेतच झाले. गुजरातीबरोबरच हिंदी आणि मराठी भाषेचाही मी अभ्यास केला. त्यामुळे हा काव्यसंग्रह अनुवादित करण्यासाठी माझ्याकडे आला. यातील कविता वाचताना राजकारणासारख्या रुक्ष वातावरणात वावरत असतानासुद्धा मोदींनी आपल्या अंतरीची आर्द्रता जपून ठेवली आहे, हे लक्षात येत होते.'' अनुवाद करणे म्हणजे एका दृष्टीने परकाया प्रवेशच असतो. त्यासाठी मूळ लेखकाच्या भावविश्‍वापर्यंत पोचावे लागते. त्याच्या भावभावनांशी समरस व्हावे लागते, असेही त्यांनी सांगितले. 

नरेंद्र मोदी यांच्या कवितांमधून देशप्रेम, निसर्गप्रेम, संस्कृती, धर्म यांच्याबद्दल आस्था, मानवी संबंधांबद्दलची कळकळ व्यक्त होते. ती त्यांच्या शब्दांतून अनुभवताना एक संवेदनशील कवी आपल्याला अनुभवायला मिळतो. 
- जयश्री जोशी, अनुवादक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune news narendra modi poetry Marathi