Pune News : सामाजिक तणाव रोखण्यासाठी एल्गार परिषदेचे आयोजन-ॲड. प्रकाश आंबेडकर

दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी (ता.१६) याप्रकरणी नियुक्त करण्यात आलेल्या चौकशी आयोगासमोर केला.
prakash ambedkar
prakash ambedkar sakal

पुणे - राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) या दोन समाजात मोठा तणाव निर्माण झाला आहे. या दोन समाजातील तणाव दूर करणे गरजेचे होते. त्यामुळे निर्माण झालेला हा सामाजिक तणाव कमी करण्याच्या उद्देशाने एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते,

असा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी (ता.१६) याप्रकरणी नियुक्त करण्यात आलेल्या चौकशी आयोगासमोर केला. ॲड.आंबेडकर यांची उलटतपासणी आज अपूर्ण राहिली. यामुळे आंबेडकर यांची यापुढील उलटतपासणी आता येत्या १९ आक्टोबर रोजी घेण्यात येईल, असे या आयोगाचे अध्यक्ष, माजी न्यायमूर्ती जे. एन. पटेल यांनी यावेळी जाहीर केले.

पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने जे. एन. पटेल यांच्या अध्यक्षतेखाली द्विसदस्यीय चौकशी आयोग स्थापन केला आहे. राज्याचे माजी मुख्य सचिव सुमीत मलिक हे या आयोगाचे दुसरे सदस्य आहेत. या द्विसदस्यीय आयोगापुढे ॲड.आंबेडकर यांची आज दुसऱ्यांदा उलटतपासणी झाली.

prakash ambedkar
PM Modi: 'D येणार आणि C जाणार..', 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे पंतप्रधान मोदींचा फॉर्मूला काय आहे? जाणून घ्या

आज या आयोगासमोर ॲड. रोहन जमादार, ॲड प्रदीप गावडे आणि ॲड. मंगेश देशमुख यांनी ॲड.आंबेडकर यांची उलटतपासणी घेतली. एल्गार परिषदेच्या प्रचार आणि प्रसार पत्रकात सामाजिक तणाव कमी करण्याबाबतचा उल्लेख का नव्हता, असा प्रश्‍न करत ॲड. गावडे यांनी तुम्ही हा दावा राजकीय हेतूने करत असल्याचे नमूद केले. त्यावर यामध्ये कसलाही राजकीय हेतू नसल्याचे आंबेडकर यांनी आयोगासमोर स्पष्ट केले.g

prakash ambedkar
J&K Anantnag Encounter: अनंतनागमध्ये चार दिवसांपासून गोळीबार सुरुच; आणखी एक जवान शहीद

सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती दिवंगत पी. बी. सावंत यांची या एल्गार परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. परंतु ते आजारी असल्याने ॲड आंबेडकर यांना या परिषदेचे अध्यक्ष करण्यात आले होते. या एल्गार परिषदेवर कोरेगाव भीमा येथील जातीय हिंसाचारास प्रोत्साहन दिल्याचा आणि नक्षलवादाचा आरोप ठेवण्यात आलेला आहे. या पार्श्‍वभूमीवर आंबेडकर यांची आज ही उलटतपासणी घेण्यात आली.

मात्र एल्गार परिषदेवर ठेवण्यात आलेला हा आरोप खोटा असून, कोरेगाव भीमा हिंसाचाराचे खरे सूत्रधार हे संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे हे दोघे असल्याचा दावा आंबेडकर यांनी यावेळी केला. आजची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर ॲड. आंबेडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

prakash ambedkar
SAKAL Exclusive: : F & O ट्रेडिंग शिकवणीतून विजय ठाकरेंचे तरुणाईला मार्गदर्शन

पत्रकारांशी बोलताना ॲड. आंबेडकर म्हणाले,

देवेंद्र फडणवीस, सुमीत मलिक, सुवेझ हक यांची साक्ष घेण्यात यावी

कोरेगाव भीमा प्रकरणाच्या तपासासाठीचा आयोग हेल्पलेस

कोरोना नसता तर, कोरेगाव भीमा प्रकरणाची सुनावणी आतापर्यंत पूर्ण झाली असती

या प्रकरणाची सुनावणी ही केवळ एका बाजूनेच सुरू आहे

या आयोगासमोर जशी हवी, तशी तपासणी होत नाही

चौकशी आयोगाचे कामकाज योग्य पद्धतीने होत नाही

सुनावणीबाबत आयोगाच्या हातातही काहीही नाही

महत्त्वाच्या व्यक्तींची साक्ष झाल्याशिवाय सुनावणी पूर्ण होणार नाही

पूर्वीच्या अनेक गोष्टी सुनावणीत पुन्हा नव्याने काढल्या जात आहेत

सातारा जिल्ह्यात जाणीवपूर्वक दंगल घडविण्यात आलेली आहे

रश्मी शुक्लांविषयी मला काहीही माहिती नाही

prakash ambedkar
Covid New Travel Advisory : विमानप्रवासापूर्वी ७२ तास आधी RT-PCR टेस्ट अनिवार्य

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com