J&K Anantnag Encounter: अनंतनागमध्ये चार दिवसांपासून गोळीबार सुरुच; आणखी एक जवान शहीद

J&K Anantnag Encounter
J&K Anantnag Encounter

Jammu Kashmir Encounter:  जम्मू-काश्मिरमध्ये गेल्या तीन दिवसांपासून दहशतवादी आणि लष्करामध्ये चकमक सुरु आहे. आज सकाळी झालेल्या चकमकीत आणखी एका जवानाचा मृत्यू झाला आहे. अनंतनाग जिल्ह्यात आज सकाळी चकमक झाली. त्यामुळे मृतांची संख्या चार झाली. गेल्या ४८ तासांपासून दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू आहे.

बुधवारी दहशतवाद्यांशी लढतांना झालेल्या चकमकीत दोन लष्कराचे अधिकारी यामध्ये एक कर्नल आणि मेजर होते. तसेच एक वरिष्ठ पोलिस अधिकारी शहीद झाले आहेत.

सुरक्षा दलाच्या जवानांनी अनंतनागमधील कोकरनाग जंगल परिसराला वेढा घातला आहे. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरु आहे. बुधवारी हे ऑपरेशन सुरु होते. ४८ तास झाले ऑपरेशन सुरु असून ४ अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष आणि डीएसपी हुमायून भट हे शहीद झाले आहेत. तर आज मृत्युमुखी पडलेल्या चौथ्या सैनिकाची ओळख अद्याप समोर आलेली नाही.

J&K Anantnag Encounter
Emergency Alert : भारत सरकारने अँड्रॉईड मोबाईलवर पाठवला 'इमर्जन्सी अलर्ट'; काय आहे याचा अर्थ?

कर्नल मनप्रीत सिंग आणि मेजर आशिष धोनचॅक यांचे पार्थिव शुक्रवारी सकाळी पानिपत येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. उपअधीक्षक हुमायून भट यांच्यावर बुधवारी त्यांच्या बडगाम येथील निवासस्थानी अंत्यसंस्कार करण्यात आले. चकमकीनंतर भारतीय लष्कराने गुरुवारी मृतदेह श्रीनगरला एअरलिफ्ट केले होते. गुरुवारी सायंकाळी त्यांच्या पार्थिवाला श्रद्धांजली वाहण्यात आली. (Latest Marathi News)

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार,  दहशतवादी ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ या लष्करे तोयबाशी संलग्नीत संघटनेचे असल्याचे समजते. या परिसरात दोन-तीन दहशतवादी लपून बसल्याचा सुरक्षा दलांना संशय आहे. हेरॉन ड्रोन आणि क्वाडकॉप्टर या परिसरात पाळत ठेवण्यासाठी आणि शोध मोहिमेत मदत करण्यासाठी तैनात करण्यात आले आहेत.

J&K Anantnag Encounter
Bilkis Bano Case: "काही दोषी गुन्हेगारांना विशेषाधिकार मिळतोय"; सुप्रीम कोर्टानं व्यक्त केली नाराजी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com