Pune News : पोटनिवडणूक प्रकरणात निवडणूक आयोगाच्या विरोधात याचिका; आयोगाचे प्रमाणपत्र घटनाबाह्य असल्याचे घोषित करण्याची मागणी

लोकसभा विसर्जित होण्यास १५ महिन्यांचा कालावधी असतानाही पोटनिवडणूक का घेण्यात आली नाही, असा प्रश्‍न या याचिकेत करण्यात आला आहे.
election commistion
election commistion sakal

पुणे - पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे निधन झाल्यानंतर पुणे लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक न घेतल्याने विधी पदवीधर तरुणाने भारतीय निवडणूक आयोगाच्या विरोधात उच्च न्यायालया रिट याचिका (रिट पिटिशन) दाखल केली आहे.

लोकसभा विसर्जित होण्यास १५ महिन्यांचा कालावधी असतानाही पोटनिवडणूक का घेण्यात आली नाही, असा प्रश्‍न या याचिकेत करण्यात आला आहे. याचिकाकर्ते सुघोष जोशी यांनी पुणे लोकसभेच्या निवडणुकीबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे माहिती अधिकार अधिनियमानुसार स्पष्टीकरण मागवले होते.

कायद्याच्या चौकटीत राहून निवडणूक न घेण्याचा निर्णय २३ ऑगस्ट २०२३ रोजी प्रमाणपत्राद्वारे आयोगाने घेतला आहे, असे आयोगाने कळविले होते. मात्र, या उत्तराने समाधान न झाल्याने जोशी यांनी अॅड. कुशल मोर, अॅड. श्रद्धा स्वरुप, अॅड. दयार सिंगला व अॅड. प्रवीण सिंग यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या कलम १५१ (क) नुसार विधानसभा, विधान परिषद, लोकसभा किंवा राज्यसभेच्या जागा रिक्त झाल्यानंतर सहा महिन्यात पोटनिवडणूक घेऊन त्या जागा भरणे, हे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे. त्यानुसार पुणे लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक २८ सप्टेंबर २०२३ पूर्वी होणे आवश्यक होते.

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी पूर्वतयारी उपक्रम सुरू झाल्यानंतर, आठ ऑगस्ट २०२३ रोजी आयोगाने सहा राज्यांमध्ये विधानसभेच्या सात जागांच्या पोटनिवडणुकीच्या कार्यक्रम जाहीर केला. त्याबरोबर पुण्याच्या लोकसभेची पोटनिवडणूक आयोगाने जाहीर केली नाही. या पोटनिवडणुकांची घोषणा केल्यानंतर तीन दिवसांनी आयोगाने केंद्र सरकारला पुणे आणि इतर मतदारसंघांची पोटनिवडणूक न घेण्याचा प्रस्ताव पाठवला, असे याचिकेत नमूद आहे. सतराव्या लोकसभेचा कार्यकाळ १६ जून २०२४ पर्यंत आहे. त्यामुळे जून २०२३ पूर्वी लोकसभेच्या रिक्त झालेल्या जागांसाठी पोटनिवडणूक घेणे शक्य होते.

election commistion
Pune Crime : पुण्यातील राजुरी येथे चोरटयांनी ३ घरे फोडली; वृध्द महिलेस मारहाण, दागिने व रोख रक्कम लंपास

या विचारानेच एक जागरूक मतदार म्हणून याचिका दाखल केली आहे. सुघोष जोशी, याचिकाकर्ते याचिकेद्वारे करण्यात आलेल्‍या मागण्या निवडणुकीबाबत आयोगाचे प्रमाणपत्र घटनाबाह्य आणि निरर्थक आहे असे घोषित करावे - पोटनिवडणूक न घेण्याच्या निर्णयामागील आयोगाने सांगितलेली करणे कायद्याच्या दृष्टीने गैर आहेत, असे स्पष्ट करावे - पुणे मतदारसंघात ताबडतोब पोटनिवडणूक घेण्याचा आदेश किंवा इतर कोणतेही योग्य आदेश करावा

election commistion
Pune News : सुखसागरनरमध्ये ड्रेनेजच्या समस्येने नागरिक त्रस्त

या कारणामुळे दाखल केली याचिका पोटनिवडणूक न घेतल्यामुळे ‘लोकप्रतिनिधित्व कायदा, १९५१ नुसार’ मतदारांना आपला प्रतिनिधी निवडण्याच्या अधिकाराची पायमल्ली होत आहे - या टप्प्यावर पोटनिवडणुका घेतल्यास लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीच्या कामांवर परिणाम होईल, असा आयोगाचा तर्क वैध नाही - नवनिर्वाचित खासदाराला केवळ तीन ते चार महिन्याचा कार्यकाल मिळाला असता हे कारण समर्पक नाही आयोगाला २९ मार्च २०२३ पासून कोणत्याही क्षणी पोटनिवडणूक घेणे शक्य होते. कारण, रिक्त जागेचा कार्यकाळ हा २९ मार्च २०२३ पासून १५ महिन्यांचा होता - रिक्त झालेल्या जागांचा कार्यकाळ एका वर्षापेक्षा कमी असल्यास आयोगाला त्या जागांसाठी पोटनिवडणूक घेता येत नाही

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com