
पुण्यातील पिझ्झा प्रेमींसाठी एक आश्चर्याची बाब समोर आली आहे. येथे एका कुटुंबाने रात्री पिझ्झा ऑर्डर केला. कुटुंबातील सर्वजण पिझ्झा खात होते. यादरम्यान त्यात असे काही घडले की सगळेच हैराण आणि अस्वस्थ झाले. पिझ्झाच्या आत एक तुटलेल्या चाकूचा तुकडा पडलेला कुटुंबीयांना दिसला. यानंतर खळबळ उडाली आहे.