Pune News : यंदाचं लक्ष्मीपूजन प्रचंड धुरात; प्रदुषणाने गाठला उच्चांक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Pollution
Pune News : यंदाचं लक्ष्मीपूजन प्रचंड धुरात; प्रदुषणाने गाठला उच्चांक

Pune News : यंदाचं लक्ष्मीपूजन प्रचंड धुरात; प्रदुषणाने गाठला उच्चांक

पुण्यात दिवाळीच्या काळामध्ये वायू प्रदूषणात मोठी वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने पुण्यामध्ये सर्वाधिक फटाके वाजला आहेत. त्यामुळे गेल्या तीन वर्षांमध्ये आकडेवारीचा उच्चांक आज नोंदवण्यात आला आहे.

हेही वाचा: Pune Metro : पुणे मेट्रोत दिवाळीनिमित्त आकर्षक सजावट

सफर संस्थेने यावर्षी घेतलेल्या नोंदीनुसार दिवाळीतले पहिले दोन दिवस हवेतल्या अतिसूक्ष्म धुलिकणांच्या प्रमाणाची सरासरी 'समाधानकारक हवा' या श्रेणीत होती. मात्र काल रात्री १२ ते आज सकाळी ९ वाजेपर्यंत अतिसूक्ष्म कणांची पातळी २१० वर (Air Quality Index) पोहोचली आहे. गेल्या दोन वर्षांपासून लक्ष्मी पूजनाच्या दिवशी ही पातळी सरासरी ५० ते १०० इतकी होती.

हेही वाचा: Pune : दिवाळीतील लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शहरात विविध भागातील सहा ठिकाणी आग

पीएम २.५ आणि पीएम १० (पार्टीक्युलेट मॅटर) या अतिसूक्ष्म कणांचे हवेतील प्रमाण सातत्याने तपासले जाते. त्यानुसार १०० पर्यंतची अतिसूक्ष्म कणांची पातळी उत्तम समजली जाते. त्यानंतर १०० ते २०० समाधानकारक, २०० ते ३०० वाईट, ३०० ते ४०० अत्यंत वाईट, तर ४०० ते ५०० या प्रमाणात अतिसूक्ष्म कणांची हवेतील पातळी ही अतिधोकादायक समजली जाते. यंदा पाऊस नसल्यामुळे आणि फटाके मोठ्या प्रमाणात वाजवले गेल्या असल्याकारणाने ही आकडेवारी वर गेली असल्याचे, सफरकडून सांगण्यात येत आहे.