Prasad Tamdar Baba : हायटेक फ्रॉड ! मोबाईलमध्ये शिरून सगळं पाहतोय 'बाबाचा प्रसाद'..तुमच्या फोनमध्ये कुणी 'हे' अ‍ॅप डाऊनलोड केलंय का असं ओळखा

Prasad Tamdar Baba AirDroid Kids App : पुण्यातील प्रसाद तामदार बाबाने 'AirDroid Kids' अ‍ॅपद्वारे भक्तांचे मोबाईल ट्रॅक करून त्यांची माहिती गोळा केली. हे अ‍ॅप जर तुमच्या मोबाईलमध्ये कोणी डाउनलोड केले असेल तर कसे ओळखायचे जाणून घ्या सविस्तर..
Prasad Tamdar Baba AirDroid Kids App
Prasad Tamdar Baba AirDroid Kids Appesakal
Updated on
  • पुण्यातील प्रसाद तामदार उर्फ 'प्रसाद बाबा' याच्यावर लैंगिक शोषणासोबतच डिजिटल पद्धतीने फसवणूक केल्याचा आरोप आहे.

  • त्याने भक्तांच्या मोबाईलमध्ये ‘AirDroid Kids’ अ‍ॅप लपवून डाऊनलोड करून त्यांची वैयक्तिक माहिती मिळवली.

  • या अ‍ॅपद्वारे कॅमेरा, लोकेशन, कॉल्स, स्क्रीन यावर नजर ठेवून तो भक्तांवर मानसिक आणि लैंगिक नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत होता.

AirDroid Kids App : सुस परिसरातील मठातल्या प्रसाद तामदार उर्फ 'प्रसाद बाबा' याच्याविरोधात अनेक तरुण भक्तांनी लैंगिक शोषणाची गंभीर तक्रार दाखल केली आहे. पोलिसांच्या तपासात उघड झालेलं एक अत्यंत धक्कादायक वास्तव म्हणजे भोंदूबाबाने ‘एअर ड्रॉइड कीड अ‍ॅप’ हे अ‍ॅप भक्तांच्या मोबाईलमध्ये छुप्या पद्धतीने डाऊनलोड केलं होतं आणि त्याचा वापर करून त्यांच्या वैयक्तिक माहितीवर नजर ठेवली जात होती.

काय आहे ‘AirDroid Kids’ अ‍ॅप?

‘AirDroid Kids’ हे अ‍ॅप मूळतः पालकांसाठी बनवलेलं आहे. याचा उपयोग पालकांना त्यांच्या मुलांच्या मोबाईलवरील हालचाली जसं की कोणत्या अ‍ॅप्सचा वापर केला जातो, मोबाईलचा स्क्रीन कसा वापरला जातो, कॅमेरा कुठे वापरला जातो हे सगळ पाहण्यासाठी होतो. हे अ‍ॅप एकदा फोनमध्ये इन्स्टॉल झालं की त्यामार्फत संबंधित मोबाईलवर रिमोट अ‍ॅक्सेस मिळतो. म्हणजे मोबाईल वापरणारा काय पाहतोय, कुठे आहे, काय बोलतोय याची माहिती दुसऱ्या व्यक्तीला मिळू शकतो.

Prasad Tamdar Baba AirDroid Kids App
RailOne App : भारतीय रेल्वेचे 'RailOne' अ‍ॅप लॉन्च, तिकीट बुकिंगपासून जेवणाच्या ऑर्डरपर्यंत सर्व काही एका क्लिकवर..

हे अ‍ॅप प्रसाद बाबा कशा प्रकारे वापरत होता?

भक्तांना "ग्रहदोष दूर करण्यासाठी कंपास अ‍ॅप डाऊनलोड करावं लागेल" असं सांगून प्रसाद बाबा त्यांच्या मोबाईलमध्ये ‘AirDroid Kids’ अ‍ॅप गुपचूप डाऊनलोड करायचा. अ‍ॅप एकदा मोबाईलमध्ये इन्स्टॉल झालं की त्यामार्फत त्या भक्ताचा कॅमेरा, लोकेशन, कॉल्स आणि स्क्रीनवरील सगळी माहिती प्रसाद बाबाच्या हातात जायची.

यानंतर बाबा त्या भक्ताच्या पर्सनल गोष्टी, रोजच्या हालचाली, घाललेले कपडे, कोणत्या ठिकाणी गेले ही माहिती वापरून "मला तुझ्याविषयी साक्षात्कार झाला आहे" असा भास निर्माण करायचा. त्यामुळे भक्तांचा त्याच्यावर विश्वास वाढायचा आणि नंतर त्याच्यावर मानसिक व लैंगिक नियंत्रण मिळवायचा तो प्रयत्न करायचा.

Prasad Tamdar Baba AirDroid Kids App
Nothing Phone 3 Launch : एकच झलक,सबसे अलग! लाँच झाला Nothing Phone 3; दमदार फीचर्स अन् किंमत फक्त..

‘AirDroid Kids’ अ‍ॅप तुमच्या मोबाईलमध्ये कुणी डाऊनलोड केलंय का, कसं ओळखाल?

जर एखाद्याने तुमच्या मोबाईलमध्ये छुप्या पद्धतीने हे अ‍ॅप इन्स्टॉल केलं असेल तर झटपट चेक करून पाहू शकता

  • Installed Apps List: मोबाईलच्या सेटिंग्जमध्ये जाऊन "Apps" किंवा "Application Manager" मध्ये पाहा. "AirDroid Kids" किंवा त्यासारखं कुठलं अज्ञात अ‍ॅप दिसत असल्यास सतर्क व्हा.

  • Device Admin Access: सेटिंग्ज > Security > Device admin apps (किंवा Device admin permission) मध्ये हे अ‍ॅप अ‍ॅड केलेलं आहे का ते पाहा.

  • Unusual Battery/Internet Usage: अनपेक्षितरीत्या जास्त डेटा वापर किंवा बॅटरी ड्रेन होत असल्यास हे अ‍ॅप बॅकग्राउंडमध्ये चालू असण्याची शक्यता असते.

  • Notification Block: हे अ‍ॅप नोटिफिकेशन्स लपवतो त्यामुळे मोबाईलवर हे दिसत नाही. पण ‘Settings > Apps > Show system apps’ वापरून शोधता येईल.

Prasad Tamdar Baba AirDroid Kids App
Video : काळीज हलवून टाकणारी घटना! 3 वर्षांच्या चिमुकल्याच्या अंगावरून नेली SUV गाडी...धडकी भरवणारा व्हिडिओ व्हायरल

सुरक्षिततेसाठी काय करावं?

  • अनोळखी व्यक्तींकडून मोबाईल देणं टाळा.

  • मोबाईलमध्ये अ‍ॅप इन्स्टॉल करताना स्वतःचं नियंत्रण ठेवा.

  • फोनमध्ये अँटीस्पायवेअर किंवा सिक्युरिटी अ‍ॅप इन्स्टॉल करा जे अशा अ‍ॅप्सचा शोध घेईल.

  • शंका आल्यास मोबाईल रीसेट करून पुन्हा सेट करा.

प्रसाद तामदार उर्फ ‘प्रसाद बाबा’ याने आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर करून भक्तांच्या अंधश्रद्धेचा फायदा घेतला. ‘AirDroid Kids’ सारख्या अ‍ॅपचा वापर करून त्याने फसवणूक केली हे दाखवतं की फसवणुकीचे मार्गही आता हायटेक झाले आहेत. त्यामुळे अंधश्रद्धेपेक्षा शंका आणि सतर्कता हाच सुरक्षिततेचा सर्वोत्तम मार्ग आहे. पोलिसांनी अशा प्रकारे फसवले गेलेल्या भक्तांनी पुढे येऊन तक्रार नोंदवण्याचं आवाहन केलं आहे.

FAQs:

1. ‘AirDroid Kids’ अ‍ॅप काय असतं?

हे अ‍ॅप मूळतः पालकांसाठी तयार करण्यात आलं असून मुलांच्या मोबाईलवरील हालचाली लक्षात ठेवण्यासाठी वापरलं जातं.

2. हे अ‍ॅप कुठे लपलेलं असतं आणि ते ओळखायचं कसं?

हे अ‍ॅप मोबाईलच्या ‘Apps’ लिस्टमध्ये दिसू शकतं; पण ‘Show system apps’ मध्ये जाऊन ते विशेषतः शोधावं लागतं.

3. एखाद्याने माझ्या मोबाईलमध्ये हे अ‍ॅप डाऊनलोड केलंय का ते कसं ओळखायचं?

सेटिंग्ज > Security > Device admin apps मध्ये जाऊन हे अ‍ॅप अ‍ॅड आहे का ते तपासा आणि Battery/Data Usage मध्ये अनपेक्षित वापर शोधा.

4. जर हे अ‍ॅप सापडलं तर काय करावं?

तत्काळ अ‍ॅप अनइंस्टॉल करा, Device admin permission रद्द करा आणि सायबर क्राइम विभागाशी संपर्क साधा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com