
Viral Video : आईसाठी तिचं मूल म्हणजे संपूर्ण जग. तिच्यासाठी स्वतःच्या प्राणांपेक्षाही अधिक प्रिय असणाऱ्या लेकराच्या जिवावर बेतलेला क्षण...आणि त्यातून घडलेला चमत्कार! गुजरातमधील नवसारी जिल्ह्यातील गांदेवी तालुक्यात घडलेल्या एका थरारक घटनेने संपूर्ण देशाला हादरवून टाकले आहे. एका ३ वर्षांच्या चिमुकल्यावरून SUV गाडी गेली, पण आश्चर्यकारकरित्या त्याला काहीही इजा झाली नाही. संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.