‘सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर’चे करिअरसाठी फायदेशीर अभ्यासक्रम

‘सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर’चे करिअरसाठी फायदेशीर अभ्यासक्रम

‘सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर’तर्फे अल्पमुदतीचे अभ्यासक्रम स्वतंत्रपणे चालविले जातात. यात कृषी आणि शेतीपूरक उद्योगासंबंधी प्रशिक्षण दिले जाते. शेतमाल निर्यात व्यवसायातील संधींचा उलगडा होणे, यशस्वी निर्यातदार बनण्यासाठी आवश्‍यक कौशल्य मिळणे, शेतीमाल निर्यातीस संधी असणाऱ्या देशांची माहिती होणे, एक्‍स्पोर्ट बिझनेसबाबतच्या ज्ञानात आणखी भर पडणे, निर्यात व्यवसायात उद्योजक बनण्यासाठीची योग्य दिशा मिळणे, व्यवसाय यशस्वी करण्यासाठी आवश्‍यक गोष्टींचे ज्ञान अवगत होणे, प्रोफेशनल नेटवर्क तयार होणे, जनसंपर्क वाढणे, निर्यातीस आवश्‍यक ग्लोबल गॅप, फायटोसॅनिटरी प्रमाणपत्राबाबतचे ज्ञान मिळणे असे फायदेही होतात. 

फळप्रक्रिया उद्योजकता
फळप्रक्रिया उद्योग सुरू करण्याविषयी इत्थंभूत मार्गदर्शन
उद्योगाची योग्य दिशा, उद्योग यशस्वी करण्याचे कौशल्य समजणे
फळांच्या प्रक्रियेबाबत सविस्तर तांत्रिक ज्ञान मिळण्यास मदत होणे
प्रोजेक्‍ट रिपोर्ट, बिझनेस प्लॅन तयार करण्याचा आत्मविश्वास मिळणे
यशस्वी फळप्रक्रिया उद्योजक होण्यासाठीच्या क्षमतांची माहिती होणे

सोयाबीन प्रक्रिया
सोयाबीन प्रक्रिया उद्योगातील संधींचा उलगडा होणे
प्रक्रिया उद्योग सुरू करण्यापासून ते प्रॉडक्‍ट मार्केटिंगपर्यंतचे मार्गदर्शन
उद्योग यशस्वी कसा करावा, याबाबतचे कौशल्य मिळणे
प्रक्रियेतील तांत्रिक बाबींचे सविस्तर ज्ञान होणे
प्रोजेक्‍ट रिपोर्ट, बिझनेस प्लॅन तयार करण्याचा आत्मविश्वास मिळणे
प्रत्यक्ष व्हिजीटद्वारे व्यवसायाचा आवाका समजण्यास मदत होणे

दूध प्रक्रिया
दूध प्रक्रिया उद्योगासाठी आवश्‍यक सर्व बाबींचे ज्ञान होणे
दुधापासून दर्जेदार पदार्थ तयार करण्याची कृती समजणे
प्रक्रियेसाठी आवश्‍यक मशिनरींचे ज्ञान होणे
उद्योग सुरू करण्यापासून ते प्रॉडक्‍ट मार्केटिंगपर्यंतचे मार्गदर्शन
उद्योग यशस्वी करण्याबाबतचे कौशल्य मिळणे
प्रोजेक्‍ट रिपोर्ट, बिझनेस प्लॅन तयार करण्याचा आत्मविश्वास मिळणे
प्रत्यक्ष व्हिजीटद्वारे व्यवसायातील गुंतवणुकीचा अंदाज येणे

आंबा प्रक्रिया
प्रक्रिया उद्योगासाठी आवश्‍यक मार्गदर्शन
आंब्यापासून विविध पदार्थ तयार करण्याची कृती माहिती होणे
प्रक्रियेसाठी आवश्‍यक यंत्रसामग्री माहिती होणे
उद्योग सुरू करण्यापासून ते प्रॉडक्‍ट ब्रॅंडिंग, मार्केटिंगपर्यंतचे मार्गदर्शन
उद्योगासाठी आवश्‍यक भांडवली गुंतवणुकीचे ज्ञान होणे
उद्योग यशस्वी करण्याबाबतचे कौशल्य मिळणे
प्रत्यक्ष व्हिजीटद्वारे तज्ज्ञांशी थेट संवाद साधता येणे

पपई प्रक्रिया
पपईपासून प्रक्रिया उद्योगातील संधींचा उलगडा होणे
पपईपासून विविध पदार्थ तयार करण्याची कृती माहिती होणे
प्रक्रियेसाठी लागणाऱ्या आवश्‍यक मशिनरींची माहिती होणे
पपई प्रॉडक्‍टला उपलब्ध मार्केटची माहिती होणे
उद्योग सुरू करण्यापासून ते प्रॉडक्‍ट ब्रॅंडिंग, मार्केटिंगपर्यंतचे मार्गदर्शन
उद्योगासाठी आवश्‍यक भांडवली गुंतवणुकीचे ज्ञान होणे
उद्योग यशस्वी करण्याबाबतचे कौशल्य मिळणे
प्रत्यक्ष व्हिजीटद्वारे तज्ज्ञांशी थेट संवाद साधता येणे

उद्योगासाठी बॅंकेकडून मिळणाऱ्या फायनान्सची माहिती होणे

भात प्रक्रिया
भात प्रक्रिया उद्योगासाठी आवश्‍यक सर्व बाबींचे ज्ञान होणे
तांदळापासून बनविता येणाऱ्या पदार्थांची कृती माहिती होणे
प्रक्रियेसाठी आवश्‍यक मशिनरींचे ज्ञान होणे
उद्योग यशस्वी करण्याबाबतचे कौशल्य अवगत होणे
प्रोजेक्‍ट रिपोर्ट, बिझनेस प्लॅन तयार करणे
प्रत्यक्ष व्हिजीटद्वारे उद्योजकांशी थेट संवाद साधता येणे

आवळा प्रक्रिया
आवळा प्रक्रियेतील संधी, उद्योगासाठीचे कौशल्य मिळणे
आवळ्यापासून बनविता येणाऱ्या पदार्थांची कृती माहिती होणे
आवश्‍यक मशिनरींची माहिती होणे
उद्योग यशस्वी करण्याबाबतचे कौशल्य अवगत होणे
प्रोजेक्‍ट रिपोर्ट, बिझनेस प्लॅन तयार करणे
यशस्वी उद्योजकांशी थेट संवाद साधता येणे

मका प्रक्रिया
मार्केटमधील मक्‍याची मागणी, प्रक्रियेतील संधी, उद्योगाचे कौशल्य मिळणे
मक्‍यापासून बनविता येणाऱ्या विविध पदार्थांची माहिती होणे
उद्योगासाठी आवश्‍यक मशिनरींची माहिती होणे
उद्योग यशस्वी करण्याबाबतचे कौशल्य अवगत होणे
प्रोजेक्‍ट रिपोर्ट, बिझनेस प्लॅन तयार करणे
यशस्वी उद्योजकांशी थेट संवाद

व्यावसायिक बंदिस्त शेळीपालन
शेळीपालन व्यवसायात यशस्वी होण्याचे कौशल्य मिळणे
चुका टाळून कोणत्या गोष्टींवर भर द्यावा याचे ज्ञान होणे
शेळी व करडांच्या संगोपनातील सर्व बाबींची शास्त्रोक्त माहिती होणे
खर्च कमी करून व्यवसायातील नफा वाढविण्याचे तंत्र अवगत होणे
गोटफार्मचा प्रोजेक्‍ट रिपोर्ट, बिझनेस प्लॅन तयार करणे
यशस्वी शेळीपालक उद्योजकांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळणे

मॉडर्न डेअरी फार्म मॅनेजमेंट
डेअरी फार्म बिझनेसमध्ये यशस्वी होण्याचे कौशल्य मिळणे
जनावरांच्या व्यवस्थापनात होणाऱ्या चुका व त्यामुळे होणारे तोटे माहिती होणे
कोणत्या चुका टाळाव्यात, कोणत्या गोष्टींवर अधिक भर द्यावा याचे ज्ञान होणे
जनावरांच्या संगोपनातील आवश्‍यक सर्व बाबींची माहिती होणे
पशुखाद्यावरील खर्च कमी करून दूध उत्पादन वाढविण्याचे तंत्र अवगत होणे
डेअरी व्यवसायाचा प्रोजेक्‍ट रिपोर्ट, बिझनेस प्लॅन तयार करणे
यशस्वी दूध उत्पादक उद्योजकांशी थेट संवादाची संधी मिळणे

पोल्ट्री फार्म मॅनेजमेंट
पोल्ट्री उद्योगातील संधींचा उलगडा होणे
कोंबड्या व पक्ष्यांच्या व्यवस्थापनातील शास्त्रोक्त बाबींची माहिती होणे
पोल्ट्री फार्म उद्योगासाठी कंपन्यांशी करार पद्धतीबाबतचे ज्ञान मिळणे
पोल्ट्रीचा प्रोजेक्‍ट रिपोर्ट, बिझनेस प्लॅन तयार करणे
यशस्वी पोल्ट्री उद्योजकांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळणे

गोड्या पाण्यातील मत्स्यसंगोपन, संवर्धन
मत्स्यपालन उद्योगातील संधींविषयी सविस्तर मार्गदर्शन होणे
माशांच्या विविध जातींची, संगोपनातील सर्व शास्त्रोक्त गोष्टींची माहिती होणे
मत्स्य खाद्य बनविण्याचे ज्ञान मिळणे
माशांच्या विक्रीसाठी उपलब्ध बाजारपेठ माहिती होणे
थेट मत्स्य फार्मवर प्रात्यक्षिक करण्याची संधी मिळणे
पोल्ट्रीचा प्रोजेक्‍ट रिपोर्ट, बिझनेस प्लॅन तयार करणे
यशस्वी मत्स्य उद्योजकांशी थेट संवाद साधता येणे

मधमाशीपालन
मधमाशीपालन उद्योगाशी निगडित सर्व बाबींचे मार्गदर्शन
मधमाश्‍यांच्या विविध जातींची, संगोपनातील शास्त्रोक्त गोष्टींची माहिती
मधमाश्‍यांच्या पेट्या हाताळण्याचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
मधासाठी उपलब्ध बाजारपेठ माहिती होणे
पीकनिहाय मधमाश्‍या ठेवल्याने होणाऱ्या फायद्यांची माहिती होणे
यशस्वी मधमाशीपालक, तज्ज्ञांशी थेट संवाद साधता येणे

देशी गाईंचे संगोपन
देशी गाईंच्या संगोपनाची गरज, फायदे याचे सविस्तर मार्गदर्शन
देशी गाईंच्या विविध जातींची, संगोपनाची माहिती
गाईंच्या शेण, मूत्रापासून बनविता येणाऱ्या उपपदार्थांची कृती माहिती होणे
उपपदार्थांसाठी उपलब्ध बाजारपेठ माहिती होणे
देशी गाईंमुळे शेतीसाठी होणारे फायदे माहिती होणे
यशस्वी गोपालकांशी थेट संवाद
प्रात्यक्षिक अनुभवसाठी गो-शाळेला शिवारफेरी

शेडनेटमधील भाजीपाला व्यवस्थापन
शेडनेट उभारणी कशी करावी, याचे मार्गदर्शन
शेडनेटचे विविध प्रकार, शेडनेटमध्ये घेता येणारी भाजीपाला पिके
दर्जेदार उत्पादनासाठी बेड तयार करणे, निर्जंतुकीकरणाची माहिती होणे
पिकांचे खत, पाणी, कीड-रोग व्यवस्थापन
शासन व बॅंकेच्या शेडनेटसाठीच्या योजना समजणे
प्रात्यक्षिक अनुभवासाठी थेडनेटला शिवारफेरी

पॉलिहाउसमधील शेती तंत्रज्ञान
पॉलिहाउसची उभारणी कशी करावी, याचे मार्गदर्शन
विविध प्रकार, पॉलिहाउसमध्ये घेता येणारी भाजीपाला, फुलपिके
दर्जेदार उत्पादनासाठी बेड तयार करणे, व्यवस्थापनाची माहिती होणे
पिकांचे खत, पाणी, कीड-रोग व्यवस्थापन
शासन व बॅंकेच्या योजना समजणे
प्रात्यक्षिक अनुभवासाठी थेट पॉलिहाउसला शिवारफेरी

सेंद्रिय शेती
सेंद्रिय शेती शास्त्रीय पद्धतीने कशी करावी, याचे मार्गदर्शन
आंतरमशागती, जिवामृत, दशपर्णी अर्क, निमार्क इ. बनविण्याचे ज्ञान मिळणे
सेंद्रिय प्रमाणीकरण पद्धतीची माहिती
प्रमाणीकरणासाठी (सर्टिफिकेशन) आवश्‍यक कागदपत्रे
सेंद्रिय उत्पादनांना स्थानिक तसेच उपलब्ध आंतरराष्ट्रीय बाजारपेठ
प्रत्यक्ष सेंद्रिय शेतीला शिवारफेरी

डाळिंब लागवड, निर्यात
डाळिंब शेती यशस्वी करण्यासाठी आवश्‍यक मार्गदर्शन
लागवडीपासून मार्केटिंगपर्यंतचे ज्ञान
बहार धरण्याच्या योग्य वेळा माहिती होणे
विश्रांतीतील महत्त्वाची कामे
तेलकट डाग, मररोग, सूत्रकृमींचे नियंत्रण
छाटणी, पानगळ व्यवस्थापन
उत्पादन खर्च कमी करून भरघोस उत्पादनाचा मंत्र
निर्यातीतील संधी, आवश्‍यक प्रमाणपत्रांविषयी मार्गदर्शन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com