पुणे: टेमघरला 44 मिमी पाऊस

राजेंद्रकृष्ण कापसे
रविवार, 25 जून 2017

टेमघर, वरसगाव या धरणाच्या भिंतीत गळती आल्याने त्याची दुरुस्ती करण्यासाठी ही धरणे पूर्ण रिकामी केली होती. त्यामुळे आता या धरणात शून्य टक्के पाणीसाठा आहे. तर पानशेत धरणात 2.51 टीएमसी 23.60 टक्के तर खडकवासला धरणात 0.25 टीएमसी म्हणजे 12.59 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

पुणे - मागील चार दिवसांपासून पुणे शहराला पाणी पुरवठा करणारी धरणे खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर या चार धरणांत पाऊस सुरू झाला असून, टेमघर येथे 24 तासांत 44 मिलिमीटर पाऊस पडला आहे. अशी नोंद खडकवासला पाटबंधारे विभागाकडे नोंद झाली आहे.

शनिवारी सकाळी सहा ते रविवारी सकाळी या 24 तासात हा पाऊस मोजण्यात आला आहे. पानशेतला २३ वरसगाव येथे २६ तर खडकवासला येथे ५ मिलिमीटर पाऊस पडला आहे. एक जूनपासून टेमघर येथे १६८, पानशेत येथे १३६ वरसगाव येथे १३५ तर खडकवासला येथे ५२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. अशी नोंद खडकवासला पाटबंधारे विभागाकडे झाली आहे. 

टेमघर, वरसगाव या धरणाच्या भिंतीत गळती आल्याने त्याची दुरुस्ती करण्यासाठी ही धरणे पूर्ण रिकामी केली होती. त्यामुळे आता या धरणात शून्य टक्के पाणीसाठा आहे. तर पानशेत धरणात 2.51 टीएमसी 23.60 टक्के तर खडकवासला धरणात 0.25 टीएमसी म्हणजे 12.59 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. या चार ही धरणातील मिळून 
2.76 टीएमसी,9.47 टक्के पाणी साठा शिल्लक आहे. मागील वर्षी 1.59 टीएमसी म्हणजे 5.47 पाणीसाठा शिल्लक होता. मागील वर्षी पेक्षा यंदा 4 टक्के जास्त पाणी साठा आहे. अशी देखील माहिती पाटबंधारे विभागाने उपलब्ध करून दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune news rain in Temghar dam area