
मावळ तालुक्यातील कुंडमळा गावाजवळील इंद्रायणी नदीवरील लोखंडी पूल रविवारी (१५ जून) दुपारी अचानक कोसळला. या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली आहे. तर या घटनेत २५ ते ३० पर्यटक नदीत वाहून गेले आहेत. या घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.