Sanjay Raut Alleges Ruling Party Can't Win Without Goons
esakal
पुणे : ‘‘आम्ही गेली ६० वर्षे रस्त्यावर उतरून संघर्ष केला, पण कधीही गुंडांना तिकीट दिले नाही. सत्तेच्या जोरावर भाजप आणि राष्ट्रवादी सर्रासपणे गुंड, चोर आणि आरोपींना तिकिटे देत आहेत. सत्ताधारी पक्ष गुंडांशिवाय निवडणूक जिंकू शकत नाही’’ अशी घणाघाती टीका खासदार संजय राऊत यांनी सत्ताधारी पक्षावर शनिवारी पुण्यात केली. पुण्यात कोठून कोयता गँग येईल व हल्ला करेल याचा काही भरवसा नाही. आता पुण्यातील कोयत्याला राष्ट्रीय हत्यार म्हणून मान्यता द्यायला हवी, अशी उपरोधिक टीका देखील त्यांनी यावेळी केली.