Pune News : पुण्यात आरोपींचे पालयन सुरूच; चौकशी सुरू असताना मोक्कातील आरोपीने ठोकली धूम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Police

Pune News : पुण्यात आरोपींचे पालयन सुरूच; चौकशी सुरू असताना मोक्कातील आरोपीने ठोकली धूम

MCOCA Accused Escaped From Police Custody : येरवड्यातील बालसुधारगृहातुन ८ आरोपी पळून गेल्याचे प्रकरण ताजे असतानाचा आता पुण्यातून मोक्का लावलेला आरोपीने पोलिसांच्या हातावर तुरी देत पळ काढला आहे.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

संतोष बाळू पवार असे पोलिसांची नजर चुकवून पळून गेले आरोपाचे नाव आहे. पिस्तुलाचा धाक दाखवून संतोष पवारने पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात असणाऱ्या अंगडियाच्या कार्यालयात जाऊन साथीदारांसह दरोडा टाकला होता.

यावेळी आरोपींनी २८ लाखांची रोख रक्कम पळवली होती. हा सगळा प्रकार अविनाश गुप्ता गँगच्या लोकांनी केल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी संतोष पवार याच्यासह अनेकांना अटक केली होती. काही दिवसांपूर्वी पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी आरोपींवर मोक्कादेखील दाखल केला होता.

पवार गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस कोठडीत होता. गुन्ह्यातील चौकशीसाठी पोलीस पवारला काल खानापूर येथील त्याच्या घरी घेऊन गेले होते. त्यावेळी उपस्थितांनी पोलिसांवर सुक्ष्म हल्ला केला.

ही संधी साधत पवारने हातातील बेड्यांसह पोलिसांच्या हातावर तुरी देत धूम ठोकली. पवार याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथकं स्थापन करण्यात आले आहेत.

पोलीस गाफील कसे?

आरोपी संतोष पवार याच्यावर गंभीर गुन्हे दाखल असून त्याच्यावर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आलेली असताना त्याला गावात घेऊन येताना पुरेसे पोलीस कर्मचारी का आणण्यात आले नाहीत? अपुरे मनुष्यबळ सोबत असताना सायंकाळची वेळ आरोपीला घेऊन तपास करण्याची का निवडण्यात आली?

स्थानिक पोलीसांची मदत का घेण्यात आली नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले असून गंभीर गुन्ह्याचा तपास करताना व आरोपी हाताळताना पोलीस गाफील राहिले असल्याचे दिसून येत आहे. याबाबत वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.