esakal | सासवडला बुधवार ते रविवार पाच दिवस जनता कर्फ्यू; व्यापाऱ्यांच्या बैठकीत निर्णय

बोलून बातमी शोधा

saswad

सासवड शहरामध्ये दिवसेंदिवस कोरोना रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. 

सासवडला बुधवार ते रविवार पाच दिवस जनता कर्फ्यू; व्यापाऱ्यांच्या बैठकीत निर्णय
sakal_logo
By
दत्ता भोंगळे

गराडे : सासवड शहरामध्ये दिवसेंदिवस कोरोना रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने व सासवड ही पुरंदर तालुक्याची मुख्य बाजारपेठ असल्याने सासवड येथील व्यापारी असोसिएशनची बैठक आज जैन मंदिरात झाली. यात सासवडला बुधवार ते रविवारपर्यंत जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सासवड (ता. पुरंदर) येथील शहरातील कोरोनाची संख्या आटोक्यात आणण्यासाठी व्यापारी असोसिएशकडून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे असोसिएशनच्या वतीने मुख्याधिकारी विनोद जळक यांनी सांगितले. तर सासवड येथे पाच दिवस जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला असून यात अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत. सासवड शहरामध्ये अनेक ठिकाणी हॉटस्पॉट आहेत. काही दिवसांतच संपूर्ण सासवड शहर हॉटस्पॉट म्हणून निर्माण होईल. त्याआधीच आपण सावधगिरीने पावले उचलत कोरोनाची साखळी तोडणे गरजेचे असल्याचे व्यापारी असोसिएशन अध्यक्ष संजय चव्हाण यांनी प्रास्ताविकात सांगितले.

हेही वाचा - पुण्यात रेमडिसिव्हिरचा पुन्हा काळा बाजार!
प्रशासनाने योग्य ती पावले वेळीच उचलणे गरजेचे होते. प्रशासनाने कोरोनावर औषधसाठा करणे गरजेचे होते. परंतु पुरंदर तालुक्यातील सरकारी दवाखान्यांमध्ये साधे खोकल्याचे सुद्धा औषध मिळत नाही. त्याच बरोबर पुरंदरच्या तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांनी मोठ्या प्रमाणावर गेल्या दोन महिन्यातच सेंटर्स उभारणे गरजेचे होते. परंतु तसे झाल्याचे दिसत नाही असे मत जिजामाता उद्यान फळे व भाजीपाला व्यापारी संघटनेचे अध्यक्ष हरुन बागवान यांनी सांगितले.

हेही वाचा - पुण्यात न्यायाधीशानेच घेतली 50 हजारांची लाच; जामीनावर झाली सुटका

पुरंदर तालुका व्यापारी असोसिएशने रविवार पर्यंत बंदचा निर्णय घेतलेला आहे. त्या निर्णयाच्या आधारे सर्व व्यापाऱ्यांनी सासवड येथील दुकाने बंद ठेवावीत व त्याची अंमलबजावणी करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाचे तयारी आहे. या बंदला सर्वांनी सहकार्य करावे. त्याच बरोबर सासवड शहरात लसीकरणाच्या दोन टीम कार्यरत आहेत. त्यांना देखील सहकार्य करावे असे सासवड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विनोद जळक यांनी यावेळी आव्हान केले.