esakal | Pune: 2 ते 9 ऑक्टोबर दरम्यान मोफत सातबारा वितरण
sakal

बोलून बातमी शोधा

सातबारा उतारा

किरकटवाडी : 2 ते 9 ऑक्टोबर दरम्यान मोफत सातबारा वितरण

sakal_logo
By
निलेश बोरुडे

किरकटवाडी: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या आदेशानुसार हवेली तालुक्यातील शेतकऱ्यांना मोफत डिजिटल सातबारा उतारा वाटप करण्यात येणार असून दि. 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती निमित्त आगळंबे येथील श्रीजीत मंगल कार्यालयात शासनाच्या सर्व विभागांमार्फत नागरिकांसाठी 'शासन आपल्या दारी' हा उपक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती हवेली तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांनी दिली आहे. 2 ते 9 ऑक्टोबर पर्यंत ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

एका तलाठ्यांकडे एक पेक्षा जास्त महसुली गावे असल्याने दिनांक 2 ऑक्टोबर रोजी महसुली सजा मुख्यालयाच्या ठिकाणी व त्यानंतर इतर गावांमध्ये दि. 9 ऑक्टोबर 2021 पर्यंत मोफत सातबारा वाटप कार्यक्रम सुरू असणार आहे. यामध्ये अद्ययावत केलेले सातबारे डिजिटल स्वाक्षरीने उपलब्ध होणार आहेत. तसेच 2 ऑक्टोबर रोजी आगळंबे येथील श्रीजीत मंगल कार्यालयात महसूल विभाग, ग्रामविकास विभाग, कृषी विभाग, आरोग्य विभाग, संजय गांधी विभाग, पुरवठा विभाग व एसटी महामंडळ अशा विविध शासकीय विभागांमार्फत राबविण्यात येत असलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती व लाभ नागरिकांना मिळवून देण्यासाठी 'शासन आपल्या दारी' हा उपक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार कोलते-पाटील यांनी दिली असून सर्व शेतकरी व नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांच्याकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा: अकरावीच्या कोट्याअंतर्गत प्रवेशासाठी शासकीय नियमाना हरताळ

'शासन आपल्या दारी' उपक्रमात सहभागी विभाग व योजना.......

1) महसूल विभाग- उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला, आधार कार्डवरील नाव दुरुस्ती.

2) संजय गांधी विभाग- संजय गांधी योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी योजना.

3) पुरवठा विभाग-नवीन रेशन कार्ड, दुबार रेशन कार्ड, रेशन कार्ड वरील नाव वाढवणे/कमी करणे.

4) पंचायत समिती-ग्रामविकास विभागाकडील विविध योजना.

5) एसटी महामंडळ-विद्यार्थी पास, ज्येष्ठ नागरिक पास व इतर योजना.

6) कृषी विभाग-कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती.

7) आरोग्य विभाग- मोफत आरोग्य तपासणी.

loading image
go to top