Pune Traffic News: डेक्कन जिमखाना बस स्थानकापासून भिडे पुलाकडील वाहतूक दोन महिने बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Deccan Gymkhana

डेक्कन जिमखाना बस स्थानकापासून भिडे पुलाकडील वाहतूक दोन महिने बंद

पुणे : डेक्कन जिमखाना बस स्थानकापासून भिडे पुलाकडे नदी पात्रातून जाणारी वाहतूक पुढील दोन महिन्यांसाठी बंद रहाणार आहे. डेक्कन जिमखाना मेट्रो स्टेशनला जोडणार्‍या पादचारी मार्गाचं काम सुरू करण्यात आल्यानं वाहतुकीत हा बदल करण्यात आला आहे. पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून ही माहिती देण्यात आली. (Pune News Traffic from Deccan Gymkhana Bus Depot to Bhide Bridge closed for two months)

हेही वाचा: खैरे, दानवेंसाठी कोपऱ्यात खुर्च्या ठेवायच्या होत्या, मग...; शहाजी पाटील बरसले

पोलिसांच्या माहितीनुसार, डेक्कन जिमखाना येथील मेट्रो स्टेशनवर जाण्यासाठी डेक्कनच्या मुख्य चौकातील पीएमपीच्या बस स्थानकाजवळ पादचारी पुलाचं तसेच तिथं जाण्यासाठीच्या जोड रस्त्याचं काम सुरू झालं आहे. वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गावर डेक्कन जिमखाना येथे मेट्रो स्टेशनचं काम सुरू आहे. त्यामुळं डेक्कनहून भिडे पुलाकडे जाणारा मार्ग पुढील दोन महिने अर्थात १४ नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार आहे.

असे असतील पर्यायी मार्ग

१) डेक्कन येथून भिडे पूलमार्गे नारायण पेठेत येणार्‍या वाहनचालकांनी लकडी पुलाचा वापर करावा.

२) जर तुम्ही जंगली महाराज रस्ता किंवा आपटे रस्त्याने डेक्कन बसस्टॉप लगत असलेल्या रस्त्याने भिडे पुलावरून जाऊ इच्छित असल्यास हा मार्ग उपलब्ध नसेल.

३) खंडोजी बाबा चौकातून डावीकडेवळून टिळक चौकापासून केळकर रस्त्याचा वापर करावा.

४) दुचाकीने प्रवास करण्यासाठी झेड ब्रिजचा (Z Bridge) वापर सुरू राहील.

५) नारायण पेठेतून भिडे पूलावरून येणाऱ्यांनी पूल संपल्यानंतर सुकांता हॉटेल समोरील रस्त्याने जंगली महाराज रस्त्याकडे जाता येईल.

Web Title: Pune News Traffic From Deccan Gymkhana Bus Depot To Bhide Bridge Closed For Two Months

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune News