esakal | Pune: भाच्यांकडून वृद्ध मामा-मामीला जबर मारहाण
sakal

बोलून बातमी शोधा

crime

पुणे : भाच्यांकडून वृद्ध मामा-मामीला जबर मारहाण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : घराच्या पुनर्विकासाच्या कामात अडथळा आणणाऱ्या मामा-मामीला भाच्यांनी घराबाहेर काढून शिवीगाळ करीत जबर मारहाण केली. याप्रकरणी एका महिलेसह आठ जणांविरुद्ध खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून तिघांना अटक केली आहे. हि घटना शुक्रवारी सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास महात्मा फुले पेठेत घडली.

कौशिक शेख, नादीक शेख व झीशान अब्दुलरशीद शेख (तिघेही रा. महात्मा फुले स्मारकाजवळ, महात्मा फुले पेठ) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अब्बासअली शेख (वय 55, रा. रा. महात्मा फुले पेठ) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेख व त्यांच्या बहिणीचे कुटुंब महात्मा फुले पेठेतील एका वाड्यामध्ये एकत्र राहतात.

हेही वाचा: दौंड : 'पाहुणे' व्यस्त असताना गळित हंगामाचा शुभारंभ

त्यांच्या बहिणीच्या कुटुंबीयांनी संबंधीत वाड्याच्या पुर्नविकासाचे काम एका बांधाकाम व्यावसायिकास दिले आहे. फिर्यादीच्या भाच्यांकडून त्यांना घर सोडण्यासाठी सतत तगादा लावला जात होता. त्यावरुन त्यांच्यात वाद होते, तसेच फिर्यादी व त्यांच्या कुटुंबाच्या काही मागण्या असल्याने ते घर सोडत नव्हते.

त्यामुळे फिर्यादीच्या भाच्यांसह सहा ते सात जणांनी शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता त्यांच्या घरात जाऊन फिर्यादीस मारहाण केली. घरातील संसारपयोगी साहित्य फेकून देत नुकसान केले.फिर्यादीच्या पत्नीलाही शिवीगाळ करून त्यांना धक्काबुक्की केली. तसेच त्यांना "आत्ताच्या आत्ता घर खाली करून द्या, नाहीतर बघून घेईन' अशी धमकी दिली. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक यशपाल सुर्यवंशी करीत आहेत.

loading image
go to top