Pune News Update : सीओईपीने आयआयटीच्या दिशेने वाटचाल करावी

चंद्रकांत पाटील सीओईपी अभिमान पुरस्कारांचे वितरण
chandrakant patil
chandrakant patil sakal

पुणे -सीओईपी हे केवळ तंत्रज्ञान विद्यापीठ नसून, मूल्यांची संवर्धन करणारी संस्था आहे. १७० वर्षांची परंपरा लाभलेल्या आणि ४५ हजारांहून अधिक माजी विद्यार्थ्यांची ताकद पाठीशी असताना सीओईपीने आता भारतीय तंत्रज्ञान संस्थेचा (आयआयटी) दर्जा प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे मत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या माजी विद्यार्थी संघटनेतर्फे अभियंता दिनानिमित्त ‘सीओईपी अभिमान’ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. सीओईपीच्या मुख्य सभागृहात आयोजित कार्यक्रमात विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.एस.डी. आगाशे, सीओईपी नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी, मानद सचिव डॉ. सुजीत परदेशी आणि माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष भारत गिते आदी उपस्थित होते.

यावेळी ‘सीओईपी अभिमान’ पुरस्काराने पुण्यातील ज्येष्ठ उद्योजक आणि शिक्षणतज्ञ अरुण कुदळे, मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, अमेरिकेतील निअर यू सर्व्हिसेसचे संस्थापक आशिष अचलेरकर, ‘अनंत डिफेन्स सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेड’चे संस्थापक चेतन धारिया, बंगळूरच्या एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीचे डॉ. विजय पटेल, एलिमेंट सोल्युशन्स इंक आणि कुकसन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड व्यवस्थापकीय संचालक डॉ. रवी एम. भटकळ यांचा सन्मान करण्यात आला.

chandrakant patil
Sambhaji Nagar : ऐन सणासुदीत ठणठणाट

केंद्रीय मंत्री धर्मेंद्र कुमार यांनी महाराष्ट्राला आयआयटी देण्याचे आणि त्याचे एक केंद्र सीओईपीला देण्याचे सूतोवाच केल्याची आठवण पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘असे सकारात्मक वातावरण असताना सीओईपीने संशोधनावर भर देऊन दिल्ली दरबारी नाममुद्रा उमटवावी, जेणेकरून त्यांना आयआयटीचे केंद्र मिळणे, सोयीचे होईल.’’ तसेच यावेळी बी.टेक. आणि एम.टेक. मध्ये उच्चश्रेणी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला आणि माजी विद्यार्थी संघटनेच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.

chandrakant patil
Pune Ganeshotsav Parking : पुण्यातील गणेशोत्सवात वाहनांसाठी पार्किंगची ठिकाणे झाली निश्चित

कार्यक्रमात कुलगुरू प्रा. एस.डी. आगाशे यांनी माजी विद्यार्थ्यांना सीओईपीच्या आजी विद्यार्थ्यांसाठी वेळ देण्याची मागणी केली. तर प्रमोद चौधरी यांनी राष्ट्रीय मुल्यांकणातील सुधारणा आणि नवीन शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर बदलांसाठीचा आराखडा मांडला. कार्यक्रमात माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष भारत गिते यांनी मनोगत व्यक्त केले. पियूष गिरगावकर यांनी सूत्रसंचालन आणि मानद सचिव डॉ. सुजीत परदेशी यांनी आभार मानले.

chandrakant patil
Nagpur News : ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र अवैध, नोकरी धोक्यात

सीओईपीला १०० कोटी मिळवून देणार

पुरस्काराला उत्तर देताना आशिष अचलेरकर यांनी त्यांचा प्रवास मांडला. ते म्हणाले, ‘‘आज सर्वत्र सीओईपीची विश्वासार्हता आहे. त्याच विश्वासार्हतेच्या जोरावर माजी विद्यार्थी संघटनेच्या मदतीने सीओईपीसाठी शंभर कोटी रुपयांचा निधी उभा करू, असा विश्वास व्यक्त केला.’’ त्यांनी स्वतः १० कोटी रुपयांची देणगी सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाला दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com