
Pune News Update
Sakal
पुणे : ‘स्विच’ कंपनीने होकार दिल्यानंतर आता चेन्नईहून पुण्यात डबलडेकर बस दाखल होत आहे. ही बस पुण्यातील मगरपट्टा, हिंजवडी व खराडी परिसरात फिरवून त्याची चाचणी घेतली जाणार आहे. ही चाचणी एक आठवडा चालणार असून, याचा सकारात्मक अहवाल आल्यानंतर पुण्यात पुन्हा एकदा डबलडेकर बसचा ‘मार्ग’ मोकळा होणार आहे. पीएमपी प्रशासन डबलडेकर बसची सेवा ‘आयटी पार्क’ असलेल्या भागात सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहे.