पुणेकरांनो, शुक्रवारऐवजी गुरुवारी पाणीपुरवठा राहणार बंद

पुणेकरांनो, शुक्रवारऐवजी गुरुवारी पाणीपुरवठा राहणार बंद

पुणे - महापालिकेच्या वडगाव, एसएनडीटी आणि वारजे जलकेंद्रात देखभाल-दुरुस्तीच्या कामामुळे या केंद्रांतर्गतचा पाणीपुरवठा येत्या गुरुवारी (ता. ११) बंद राहणार आहे. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (ता. १२) कमी दाबाने आणि उशिराने पाणीपुरवठा होईल.

दरम्यान, शुक्रवारी पाणीपुरवठा बंद राहील, असे महापालिकेने सोमवारी कळविले होते. मात्र, त्यात बदल करून गुरुवारी पाणी बंद राहणार असल्याचे मंगळवारी जाहीर केले.

पाणीपुरवठा बंद राहणारा भाग पुढीलप्रमाणे : वडगाव जलकेंद्र परिसर : हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ, कोंढवा बुद्रूक या परिसराचा पाणीपुरवठा बंद असणार आहे.

चतु:शृंगी, एसएनडीटी, वारजे जलकेंद्र परिसर : पाषाण, औंध, बोपोडी, खडकी, चतु:शृंगी, गोखलेनगर, जनवाडी, रेंजहिल्स, बावधन, बाणेर, चांदणी चौक, किष्किंधानगर, रामबाग कॉलनी, डावी उजवी भुसारी कॉलनी, एकलव्य कॉलनी, महात्मा सोसायटी, गुरू गणेशनगर, वारजे हायवे, वारजे माळवाडी, रामनगर, अहिरेगाव, पॉप्युलरनगर, अतुलनगर, शाहू कॉलनी, वारजे जलशुद्धीकरण परिसर, औंध बावधन, सूस, सुतारवाडी, भूगाव रस्ता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com