Pune News : पाच ट्रिलियन कोटी डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे उद्दीष्ट गाठू- अजित पवार

बारामती सहकारी बँकेच्या 62 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अजित पवार बोलत होते.
ajit pawar
ajit pawar sakal
Updated on

बारामती - जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार काम करत असून महाराष्ट्र सरकार यात प्रयत्न करीत आहे. पाच ट्रिलियन कोटी डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे उद्दीष्ट असून ते साध्य केल्यास भारत बलाढ्य अशा जपान व जर्मनीलाही मागे टाकू शकतो, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

बारामती सहकारी बँकेच्या 62 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अजित पवार बोलत होते. ते म्हणाले, अनेक जिल्हा सहकारी बँकात कर्ज देताना कठोर भूमिका न घेतल्याने बँका अडचणीत आल्या आहेत, वन टाईम सेटलमेंट सर्वच प्रकरणात करणे शक्य नाही, हे सर्वांनी लक्षात घ्यावे.

रिझर्व्ह बँकेकडून नागरी सहकारी बँकांच्या अडचणी समजून घेतल्या जात आहेत तसेच रिझर्व्ह बँकेकडून सर्वच व्यवहारांवर कडक नजर ठेवली जात आहे. त्या मुळे या पुढील काळात सर्वच बँकांना आर्थिक शिस्त पाळावीच लागणार आहे.

ajit pawar
Solapur News : मोहोळ तालुक्यात ७५ दिवस पुरेल एवढाच चारा उपलब्ध,पिण्याचे पाणी,चाऱ्याचे नियोजन करा- यशवंत माने

बारामती बँकेने एनपीए तीन टक्क्यांच्या आत व पुढील सभेपर्यंत शून्य टक्क्यांपर्यंत आणण्याचा प्रयत्न करावा, अशी सूचना त्यांनी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव यांना दिली. पुढील सभेत दोन आकडी लाभांश देणार असाल तरच सभेला येईन, असेही अजित पवार यांनी नमूद केले. कर्मचा-यांनी बदलीसाठी दबाव आणू नये, अन्यथा ज्या गावात शाखा होतील, तेथील कर्मचारी भरती केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

दरम्यान बँकेचा एनपीए 14.85 टक्क्यांवरुन 7.65 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे, डिसेंबरपर्यत हा एनपीए तीन टक्क्यांवर आणू, पुढील वार्षिक सर्वसाधारण सभेत हाच एनपीए शून्य टक्क्यांवर आणला जाईल, अशी ग्वाही बँकेचे अध्यक्ष सचिन सातव यांनी दिली.बँकेला 8.45 कोटींचा नफा झाला असून ठेवी 2384 कोटी तर कर्जे 1405 कोटींवर गेल्याचे त्यांनी सांगितले.

ajit pawar
Pune Ganeshotsav : सर्वाधिक दणदणाट मंडईत

कार्यकारी संचालक रवींद्र बनकर यांनी कार्यक्रमपत्रिकेचे वाचन केले, उपाध्यक्ष किशोर मेहता यांनी आभार मानले. या प्रसंगी तैनूर शेख, करीम बागवान, संभाजी माने, ज्ञानदेव बुरुंगले, बाबूराव कारंडे, अँड. प्रभाकर बर्डे, सूर्यकांत गादीया यांनी मनोगत व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
The factory will also organise village-level farmer meetings on AI-based sugarcane farming from July 27 to August 2.
Marathi News Esakal
www.esakal.com