Pune News : बाणेर येथे विहिरीत उडी मारून युवकाची आत्महत्या

रात्री जेवण झाल्यानंतर घरातील सगळे झोपी गेले असतां या तरुणाने घराजवळील विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली .
baner
baner sakal

बालेवाडी - बाणेर येथे कळमकर चौका जवळील विहिरीत स्वप्निल राऊत ( वय ३२) या युवकाने आत्महत्या केल्याची घटना( ता. 3 नोव्हेंबर) रोजी रात्री १२.३० च्या दरम्यान

घडली .या आत्महत्येमागे मानसिक आजार व घरगुती वाद असण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

बाणेर येथे राघू अण्णा कळमकर चौकाजवळील शिवनेरी सोसायटीला लागून असणा-या निखिल कळमकर यांच्या मालकीच्या विहिरीत स्वप्निल राऊत (वय ३२) सध्या राहणार बाणेर, मुळगाव - नरवेल ,ता. मलकापुर, जि. बुलढाणा या तरुणाने (ता. 3 नोव्हेंबर ) रोजी रात्री १२.३० च्या दरम्यान आत्महत्या केली . रात्री जेवण झाल्यानंतर घरातील सगळे झोपी गेले असतां या तरुणाने घराजवळील विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली .

त्याच्या घरी आईं, वडिल, भाऊ, पत्नी, व एक लहान मुलगी असा परिवार आहे.गेल्या दोन वर्षापासून त्याला मानसिक त्रास होत होता ,त्याच बरोबर त्याच्या व्यसनामुळे घरात सतत भांडणे होत होती .यातूनच या युवकाने आत्महत्या केली असण्याची शक्यता चतुश्रृंगी पोलिस ठाण्याचे सहय्यक पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी व्यक्त केली.

baner
Pune Crime : मॉडेल कॉलनीत पगारावरून झालेल्या मारहाणीत कामगाराचा मृत्यू

सदर विहीर अंदाजे ७० ते ७५ फूट खोल असून अंदाजे ३० ते ३५ फूट पाणी असल्याने मृतदेह शोधण्यात अडचण येत होती.अग्निशामक दलाच्या जवानांनी सकाळी दहा ते सायंकाळी साडेसात पर्यंत प्रयत्न करून मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर ऋषिकेश शिवतारे यांच्या खाजगी पाणबुडीच्या मदतीने

baner
Pune News : उच्च शिक्षण सहसंचालकांच्या बदल्या; पुणे विभागाचा कार्यभार डॉ. केशव तुपे यांच्याकडे

अग्निशामक दलाच्या जवानांनी बुडीत व्यक्तीस बाहेर काढले. यावेळी अग्निशमन केंद्राचे अधिकारी शिवाजी मेमाने, कमलेश सनगाळे ,बालराज संगम ,रोहित पुष्कराज तसेच इतर जवानांच्या मदतीने बुडीत व्यक्तीचा शोध घेण्यात आला . या व्यक्तीचा मृतदेह शवविच्छेदना साठी औंध येथील रुग्णालयात पाठविण्यात आला असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com