

PMC Claims 30,000 Cubic Meter Silt Removal from Katraj Lake
Sakal
कात्रज : राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील तलावाच्या स्वच्छतेसाठी महापालिकेने एनडीएमए प्रकल्पांतर्गत जलसंपदा विभागाकडे गाळ काढण्याचे नियोजन सोपवले होते. यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीही मंजूर करण्यात आला. पालिकेकडून जलसंपदा विभागाने एप्रिल महिन्यात हा गाळ काढला असल्याचे सांगण्यात येत आहे. हा गाळ काढून तो तलावाच्या बाजूलाच साठवण्यात आल्याचे सांगण्यात आले.