Katraj News : वसाहतीतील मलनिस्सारणाचे पाणी स्वतंत्रपणे वळवणार; पालिकेची भूमिका; दुर्गंधीच्या समस्येतून सुटका होणार असल्याचा दावा!

Sewage Diversion : कात्रज तलावातील नवी वसाहत व संतोषनगर येथील मलनिस्सारणाचे पाणी स्वतंत्रपणे वळवून थेट एसटीपीमध्ये नेले जाणार आहे, यामुळे तलाव परिसरातील दुर्गंधी कमी होईल आणि नागरिकांचे आरोग्य सुधारेल.
Municipal Authorities Plan Full Capacity Sewage Treatment

Municipal Authorities Plan Full Capacity Sewage Treatment

Saklal

Updated on

कात्रज : कात्रज तलावात मिसळणारे वसाहतीतील मलनिस्सारणाचे पाणी स्वतंत्रपणे वळवून ते थेट मल्लनिसारण वाहिनीद्वारे नायडू सांडपाणी प्रक्रिया केंद्रात (एसटीपी) नेण्यात येणार आहे. यामुळे तलाव परिसरातील दुर्गंधीची समस्या कायमस्वरूपी कमी होईल, असा दावा महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे. कात्रज नवी वसाहत, संतोषनगर आणि आजूबाजूच्या भागातून येणारे मैलापाणी प्रक्रिया न होता तलावात जात असल्याने तलावाची दुरवस्था झाली असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com