

Untreated Sewage Pollutes Katraj Lake Despite STP Project
Sakal
कात्रज : राजीव गांधी प्राणी संग्रहालयालगत असलेल्या कात्रज तलावात प्रक्रिया न केलेले सांडपाणी मिसळत असल्याने लेक टाऊन व परिसरात तीव्र दुर्गंधी, डासांचा प्रचंड प्रादुर्भाव आणि नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तलावासाठी स्वतंत्र सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी प्रकल्प) अस्तित्वात असतानाही प्रत्यक्षात सर्व मैलापाणी त्यात प्रक्रिया न होता थेट तलावात सोडले जात असल्याचे वास्तव समोर आले आहे.