

Civic Negligence Leads to Serious Accident on Sinhagad Road
Sakal
सिंहगड रस्ता : “थोडक्यात डोळा बचावला.. ” हे शब्द वाचतानाच अंगावर काटा येतो. परंतु प्रशासनाच्या चुकीच्या आणि निष्काळजी कामाचा फटका पुन्हा एकदा एका निरपराध विद्यार्थ्याला बसला आहे. सिंहगड रस्त्यावरील आनंदनगर येथील सनसिटी रस्ता परिसरात महापालिकेच्या अर्धवट आणि धोकादायक कामामुळे नववीत शिकणारा समर्थ पाठक गंभीर जखमी झाला.